शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचा मृत्यू चुकीच्या आॅपरेशनमुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 21:33 IST

पिंपळनेर : मयत मुलीच्या आईची पोलिसात तक्रार

पिंपळनेर- गरोदर मातेच्या प्रसूती डिलिव्हरी प्रसंगी चुकीच्या आॅपरेशनमुळे मृत्यू झाल्याने पिंपळनेरच्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत गरोदर मातेची आई सुरेखा मोरे यांनी केली आहे़ यासंदर्भात त्यांनी पिंपळनेर पोलिसात तक्रारी अर्ज दिलेला आहे़सुरेखा यशवंत मोरे यांच्या म्हणण्यानुसार, मुलगी सुजाता सुदर्शन जाधव (रा. वरणगाव ता. भुसावळ जि. जळगाव) ही गरोदर होती़ तिची माहेरी पिंपळनेर येथील डॉ. राहुल तावडे यांच्याकडे पाचव्या महिन्यापासून प्रसुतीपूर्व उपचार सुरू होते. तिला २४ आॅक्टोबर २०२० रोजी प्रसूतिवेदना सुरु झाल्याने डॉ. तावडे यांच्याकडे दाखल केले़ त्यांनी सर्व तपासण्या पूर्ण केल्यानंतर गर्भाशयातील पाणी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले़ बाळाला धोका असल्याने सिजर करावेच लागेल असेही ते म्हणाले़ मी मुलीची आई असल्याने नॉर्मल प्रसुतीचा आग्रह धरला पण त्यांनी ऐकले नाही व रात्री आठ वाजता मुलगी सुजाताचे सिजर केले. सिजरपूर्वी माझ्या मुलीस कोणताही आजार नव्हता़ असे सुरेख मोरे यांचे म्हणणे आहे़आॅपरेशन झाल्यानंतर माझी मुलगी शुद्धीवर आल्यानंतर तिचे पोट दुखू लागले़ डॉ. तावडे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सिजरमुळे दुखत असेल असे सांगितले व त्यांनी औषधोपचार सुरू केला़ मात्र वेदना कमी झाल्या नाहीत़ २६ आॅक्टोबर २०२० रोजी मुलीचे पोट अधिकच फुगले़ पोटाचा घेर वाढत गेला, पुन्हा सोनोग्राफी केली़ डॉ. तावडे यांनी पुढील उपचारासाठी धुळे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले़ दि. २६ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत दाखल करून, औषध उपचार करून देखील पेशंटला बरे वाटत नव्हते़धुळे येथील दोन्ही डॉक्टरांनी पेशंट बरे होत नसल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले़ मी मुलीला ६ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता घाटी रुग्णालयात अ‍ॅडमिट केले़ ते सोनोग्राफी करून त्वरित आॅपरेशन करण्याचे सांगितले़ ७ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता आॅपरेशन केले़ मात्र ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता तिचा मृत्यू झाला. यासंदर्भात मुलीची आईने पिंपळनेर येथे डॉ. राहुल तावडे यांनी प्रसूतीपूर्वी केलेल्या आॅपरेशनावेळी काही चुका केल्याने तिचे पोट फुगले व तेथूनच तिची तब्येत खालावली़ धुळे येथील डॉक्टरांनी ऐंशी हजार रुपये बिल घेतले व औषधी तपासनी ६० हजार रुपये व पिंपळनेर येथील डॉ. राहुल तावडे यांनी रुपये ५० हजार घेतले़ मात्र बिल दिले नाही़ एवढे करूनही मुलीचा जीव वाचला नाही़ डॉ. तावडे यांच्या चुकीच्या आॅपरेशनमुळे व धुळे येथील दोन डॉक्टरांच्या निष्काळजीपणा माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार सुरेखा मोरे यांनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे