रविवारपासून मोफत पशुवैद्यकीय शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 09:57 PM2020-07-03T21:57:52+5:302020-07-03T21:58:18+5:30

धुळे ग्रामीण : पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

Free veterinary camp from Sunday | रविवारपासून मोफत पशुवैद्यकीय शिबिर

रविवारपासून मोफत पशुवैद्यकीय शिबिर

Next

धुळे : धुळे ग्रामीण मतदार संघात रविवार पासून जि.प. पशुसंवर्धन विभाग व माजी आमदार द.वा.पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान मोफत पशुवैद्यकीय आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती जि.प.सदस्य राम भदाणे यांनी दिली.
दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिबिर आयोजित करण्यात आले आहे़ यावर्षीही संपुर्ण धुळे ग्रामीण मतदार संघातील प्रत्येक गावांत जाऊन पशुवैद्यकीय शिबीर घेण्यात येणार आहे. सदरचे शिबीर ५ जुलै ते ६ सप्टेंबर या कालावधीत सुरु राहील़ दररोज मतदार संघातील ४ गावांमध्ये पशुवैद्यकीय शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराची सुरुवात ५ जुलै रोजी नगांव, तिसगांव, ढंढाणे व वडेल या गावापासून सकाळी ८ वाजेपासून सुरु होत आहे.
शिबीरासाठी तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. सचिन शिंपी, डॉ. मिलींद वडाळकर, डॉ. भरत बोरसे, डॉ. अमोल बोरसे, डॉ. अनिल पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. रोहिदास पवार, डॉ. पंकज शिंदे, डॉ. विजय भामरे, डॉ. अजय पाटील, डॉ. दत्तू पाटील, डॉ. विकास साळुंके, डॉ. मनोज पाटील, डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. कुणाल मराठे, डॉ. मोहन पाटील, डॉ. किरण पाटील, डॉ. पोपट चौधरी, डॉ. चेतन शिंदे, डॉ. संदीप मोरे यांचे सहकार्य लाभणार आहे. सदर शिबीराचा लाभ पशुपालकांनी घ्याव्या, असे आवाहन जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, नगावच्या सरपंचा ज्ञानज्योती भदाणे, राम भदाणे यांनी केले आहे.

Web Title: Free veterinary camp from Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे