कोरोना काळात गरजू लोकांसाठी मोफत अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:37 IST2021-05-19T04:37:10+5:302021-05-19T04:37:10+5:30
संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १५ ते २१ मे या कालावधीत हा मोफत अन्नदान सप्ताह साजरा केला जात ...

कोरोना काळात गरजू लोकांसाठी मोफत अन्नदान
संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १५ ते २१ मे या कालावधीत हा मोफत अन्नदान सप्ताह साजरा केला जात आहे. या उपक्रमांतून भुकलेल्यांना दोन वेळेच्या अन्नाची सोय करुन देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कोरोना महामारीच्या काळात राज्यात कुणीही उपाशी राहू नये शासनाने मोफत शिवभोजन योजना सुरू केली आहे. धुळ्यातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख अनिकेत शिकारे यांनीही आदर्श घेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरोनाच्या संकट काळात हातावर पोट असलेला कुणीही नागरिक उपाशी राहू नये म्हणून अन्नदान सप्ताह राबविण्याचा निर्णय घेतला. १५ मे पासून सुरु असलेला हा उपक्रम २१ मे पर्यंत अखंड सुरू राहणार आहे. शहरातील पेठ विभागातील गल्ली क्रमांक ४ मधील शनी मंदिरासमोर कांती कॉम्प्लेक्सच्या बाजूला रोज सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत गरजूंना मोफत भाेजन वाटप करण्यात येत आहे. यातून कुणीही गरजू उपाशी राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. गरीब व गरजू नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील शिकारे यांनी केले आहे.
नागरिकांना मोफत अन्नदान करत असताना अनिकेत शिकारे, राहूल शिकारे, आशुतोष शर्मा, पवन कुलकर्णी, आनंद वाघ, अक्षय वराडे, अतुल शिंदे, शुभम चांदवडकर, मनोज वाघ आदी उपस्थित होते.