शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस विकत की फुकट, सर्वसामान्यांना उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 22:04 IST

वार्तापत्र : सुनील बैसाणे कोवीड १९ लसीकरणासाठी गठीत टास्क फोर्सची बैठक गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत कोरोना ...

वार्तापत्र : सुनील बैसाणेकोवीड १९ लसीकरणासाठी गठीत टास्क फोर्सची बैठक गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत कोरोना लसीकरणाची पुर्वतयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय यादव यांनी यंत्रणेला दिल्या. तसेच लसीकरणाचा आराखडा आणि नियोजन अचूक होईल याची खात्री करावी, तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करावा, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलीस, शिक्षण, अंगणवाडी, ग्रामपंचायत, समाजकल्याणसह शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे असे मार्गदर्शनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासनाने कोरोना लसीकरणाचे चार टप्पे केले आहेत. कोवीडची लस आल्यावर प्रथम आरोग्य कर्मचारी, काेरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत कर्मचारी अर्थात फ्रंटलाईन कर्मचारी, ५० वर्षावरील नागरिक आणि दुर्धर आजार असलेले रुग्ण यांना लसीकरण केले जाईल. पहिल्या टप्प्यात ९ हजार १९६ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात ७३ शासकीय व १९९ खासगी आरोग्य संस्था आहेत. तसेच शीतसाखळी अबाधित राखण्यासाठी ६२ आयएलआर व ६१ डीप फ्रीजर उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा लस भांडारगृह देखील आहे. एकूणच लस साठविण्याची क्षमता धुळे जिल्ह्यात असल्याची माहिती या आढावा बैठकीतून पुढे आली. तालुक्याच्या ठिकाणी लस पोहोचविण्यासाठी वाहने उपलब्ध आहेत. भारतात तीन कंपन्यांमध्ये कोरोना लसीची निर्मिती होत आहे. त्यात भारत बायोटेक, सीरम या कंपन्यांचा समावेश आहे. मार्च, एप्रिल महिन्यात लसीकरणाचा सुरूवात होईल अशी शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. चार प्रकारच्या लस तयार केल्या जात आहेत. त्यापैकी कोणती लस देण्याचा निर्णय सरकार घेवू शकते याबाबत अजुनही निश्चित कल्पना नाही. शिवाय कोरोनाची लस मोफत आहे किंवा ती विकत घ्यावी लागेल याबाबत देखील शासनाचे दिशानिर्देश अजुनही प्राप्त झाले नसल्याने प्रशासन देखील संभ्रमात आहे. दुसरीकडे प्राधान्याने चार टप्पे पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल आणि त्यानंतर सर्वसामान्यांना लस कधी उपलब्ध होईल याची उत्सुकता लागली आहे. परंतु त्याबाबत निश्चित काहीही सांगता येणार नाही.

टॅग्स :Dhuleधुळे