शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री गो.शि.चौधरी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:18 IST

धोंगडे दिगर येथे आदिवासी आश्रम शाळेत आज अंत्यसंस्कार

पिंपळनेर : राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व बल्हाणे येथील दीनदयाळ आदिवासी सूतगिरणीचे संस्थापक चेअरमन गोविंद शिवराम चौधरी (वय ८० वर्ष) यांचे शुक्रवारी दुपारी २ वाजता  वृद्धापकाळाने   धुळे येथील निवासस्थानी निधन झाले.   साक्री तालुक्यातील धोंगडे दिगर येथे आदिवासी आश्रम शाळेत शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.गोविंद शिवराम चौधरी यांचा जन्म  साक्री तालुक्यातील  धोंगडे दिगर येथे १८ जुलै १९३९ रोजी झाला.  त्यांनी एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई येथे फ्रुड सप्लाय इन्स्पेक्टर म्हणून  नोकरी केली.  १९७२ साली ते नोकरी सोडून राजकारणात उतरले आणि त्यांनी कासारे गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत ते विजयी होऊन  कै. व्यंकटराव रणधीर यांच्या जिल्हापरिषद अध्यक्षतेखाली ते शिक्षण सभापती झाले. १९८५ साली  गोविंद शिवराम चौधरी हे भारतीय जनता पार्टी पक्षातून साक्री विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. ते सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून गेले. त्यांनी सन १९९४ पासून साडे तीन वर्ष भाजप- सेना युतीच्या शासनात आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली  व एक मुलगा असा परिवार आहे. त्यापैकी चार मुली एमबीबीएस डॉक्टर आहेत तर मुलगा उदय चौधरी राजकारणात वडिलांचा वारसा पुढे चालवत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे