जळगाव घरकूल प्रकरणी पुढील कामकाज २७ जूनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 13:26 IST2019-06-07T13:25:36+5:302019-06-07T13:26:02+5:30
धुळे न्यायालय : न्यायाधीश एस़ आऱ उगले यांच्याकडे झाले कामकाज

जळगाव घरकूल प्रकरणी पुढील कामकाज २७ जूनला
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जळगाव घरकूल प्रकरणी पुढील कामकाज २७ जून रोजी होणार आहे़ शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल अपेक्षित असल्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे होते़ परंतु जळगाव घरकूल प्रकरणाच्या विशेष न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ यांची प्रकृति अस्वस्थ असल्यामुळे त्या रजेवर होत्या़ त्यामुळे या प्रकरणाचे कामकाज न्यायाधीश एस़ आऱ उगले यांच्यासमोर झाले़ सुरुवातीला सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व संशयित आरोपींची हजेरी घेण्यात आली़ पुष्पा पाटील वगळता सर्व संशयित हजर होते़ संशयित अजय जाधव आणि अरुण शिरसाळे यांचे गैरहजर वॉरंट रद्द करत त्यांना प्रत्येकी ४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला़ यावेळी अॅड़ जितेंद्र निळे, अॅड़ प्रमोद पाटील, अॅड़ राजा ठाकरे, अॅड़ अकिल इस्माईल, अॅड़ प्रकाश पाटील, अॅड़ अविनाश भिडे, अॅड़ एस़ आऱ वाणी, अॅड़ सी़ डी़ सोनार आदी वकिल उपस्थित होते़