लोकमत आॅनलाईनधुळे : गावठी बनावटीची स्टेनगन, दोन मॅगझिन व १३ पितळी काडतूस शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथून जप्त करण्यात आले आहेत. मंगळवारी संध्याकाळी शिरपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. हे साहित्य बेकायदेशीर व विनापरवाना जवळ बाळगल्याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यात उडीसा राज्यातील दोघांचा समावेश आहे.या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर शहर पोलिसांनी मंगळवार २६ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कळमसरे येथे जाऊन ही कारवाई करत स्टेनगन व अन्य साहित्य जप्त केले. हे सर्व साहित्य संतोष रेड्डी व सुरेश राजू शर्मा दोन्ही रा.कोराकुट, उडीसा यांनी सुमारे सात-आठ महिन्यांपूर्वी कळमसरे येथील छगन किसन कोळी याच्या ताब्यात दिले होते. या साहित्याची किमती ५४ हजार ६०० रुपये एवढी आहे.याा प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याविरूद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन.यु. दाभाडे करीत आहेत.कारवाई झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.डी. सानप व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे व शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दाभाडे यांनी भेट देऊन माहिती घेतली तसेच तपासाबाबत सूचना दिल्या.
धुळे जिल्ह्यातील कळमसरे येथे गावठी बनावटीची स्टेनगन, दोन मॅगझिन व १३ काडतूस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 13:16 IST
तिघांना अटक; उडीसाच्या दोघांचा समावेश
धुळे जिल्ह्यातील कळमसरे येथे गावठी बनावटीची स्टेनगन, दोन मॅगझिन व १३ काडतूस जप्त
ठळक मुद्देस्टेनगनसह दोन मॅगझिन व १३ पितळी काडतूस जप्त५४ हजार ६०० रुपये किमतीचे साहित्यभारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा; तिघांना अटक; उडीसा राज्यातील दोघांचा समावेश