शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:37 IST

सावळदे येथील प्रवीणसिंग राजेंद्र गिरासे यांनी १६ रोजी रात्री ८ वाजता लग्नाचा वाढदिवस परिवारासोबत साजरा करून ड्युटीवर जाण्यासाठी निघाले ...

सावळदे येथील प्रवीणसिंग राजेंद्र गिरासे यांनी १६ रोजी रात्री ८ वाजता लग्नाचा वाढदिवस परिवारासोबत साजरा करून ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते़ दुचाकीने (क्रमांक एम़एच़१८-बीक्यू ८६८२) ते करवंद येथील मका फॅक्टरीत कामावर जाण्यासाठी निघाले होते. शिरपूर ते करवंद गावादरम्यान असलेल्या आशीर्वाद हॉटेलसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला होता. अपघात होताच चालक वाहनासह फरार झाला होता. मात्र काही तासातच शिरपूर पोलिसांनी त्या अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेतला़

प्रवीणसिंग सौदाणसिंग राजपूत रा. किरण सोसायटी शिरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक आकाश संभाजी गवळी रा. साईबाबा नगर नकाणे रोड देवपूर, धुळे याच्या विरोधात शिरपूर पोलिसात भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७, १८४ प्रमाणे मोटार अपघात नोंदविण्यात आला आहे़

दुचाकी स्लीप, एकाचा मृत्यू

हरिचंद्र लिलाचंद माळी (२४) रा. वरवाडे शिरपूर हा युवक आपल्या मित्रासोबत दुचाकी गाडीने जात असताना ११ फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास अरुणावती नदीवरील पुलावर गाडी घसरल्याने गंभीर जखमी झाला होता. धुळे येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यू नोंदविण्यात आला आहे.