शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा विळखा, चिंतेची बाब
धुळे : शहरात प्रमुख रस्त्यावरील वाढते अतिक्रमण ही चिंतेची बाब ठरली आहे. शहरातील आग्रारोड, चौथी, पाचवी आणि सहाव्या गल्लीत हळूहळू अतिक्रमण वाढत आहे. शहरातील महात्मा गांधी चौकात तर दोनदा अतिक्रमण काढून पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे. शिवतीर्थ ते दसेरा मैदानापर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बांधण्यात आलेल्या गटारीच्या स्लॅबवर रस्त्याचे काम सुरू होण्याआधीच अतिक्रमणाला सुरुवात झाली आहे.
पांझरा नदीवरील पादचारी पुलाचे संरक्षण कठडे गायब
धुळे : शहरातील मोठ्या पुलाला लागून बांधण्यात आलेल्या पादचारी पुलावर सोडा वॉटर, चायनीजच्या गाड्या लागतात. सायंकाळी त्या ठिकाणी टवाळखोर आणि मद्यपी लोक बसून असतात. त्यामुळे तेथून पायी चालणे कठीण झाले आहे. या पुलाच्या संरक्षण कठड्याचे लोखंडी पाईप कोणीतरी चोरून नेत आहे. हळूहळू एक - एक करीत सर्वच कठड्याचे लोखंडी पाईप चोरटे चोरून नेत आहे. याकडे पाेलिसांनी आणि महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.