बकऱ्यांसाठी शेत केले मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 10:48 PM2019-12-08T22:48:02+5:302019-12-08T22:48:40+5:30

कापडणे : अवकाळी पावसामुळे फुलकोबी पिकाचे नुकसान, शेतकरी हवालदिल

 The farm is free for goats | बकऱ्यांसाठी शेत केले मोकळे

Dhule

Next

कापडणे : अवकाळी पावसामुळे शेतातील फुलकोबी पीक खराब झाल्याने बकऱ्यांना चरण्यासाठी शेत खुले करावे लागल्याची वेळ येथील शेतकºयावर आली आहे.
येथील शेतकरी तथा धुळे जिल्हा शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष आत्माराम बळीराम पाटील यांनी एक एकर क्षेत्रात फुलकोबीची लागवड केलेली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे हे पीक पूर्णत: खराब झाले आहे. यामुळे अखेर संपूर्ण शेतात शेळ्या, बकºयांना चरण्यासासाठी त्यांनी शेत मोकळे केले आहे.
कापडणेसह परिसरात सलग तीन महिन्यापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पिके जोमदार फुलली होती. मात्र, परतीच्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील अन्य पिकांसह भाजीपाला सडून खराब झालेला आहे. शेतकरी आत्माराम पाटील यांनी खाजगी सावकाराकडून व्याजाचे पैसे उचलून फुलकोबीची शेती उत्तमरित्या फुलविली होती.
काही दिवसांनी काढणीवर आलेल्या फुलकोबीचा अवकाळी पावसाने घात केला. फुलकोबी पिकावर मोठ्या प्रमाणात अळयांचा प्रादुर्भाव झाला.
सलग पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात गवताची उगवण झाली. यामुळे फुलकोबी पिकांवर अळया व कीटकांचा प्रादुर्भाव जास्तच वाढला. हजारो रुपये खर्चून महागडी किटकनाशकांची फवारणी देखील केली. मात्र, शेवटपर्यंत फुलकोबीवरील अळ्या कमी झाल्या नाहीत. यामुळे नुकसान झालेले आहे.
शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांना त्वरित आर्थिक मदत देऊन पीक विम्याची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.

Web Title:  The farm is free for goats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे