संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:24 IST2020-12-12T12:23:22+5:302020-12-12T12:24:12+5:30
पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे आमदारांना दिले निवेदन

dhule
धुळे : संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे धुळे शहराचे आमदार फारूख शहा व साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने २६ नोव्हेंबर रोजी ३१ डिसेंबर २००७ नंतर ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर केली आहेत अशा कर्मचार्यांची वेतनवाढ बंद करण्यात यावी किंवा अतिप्रदान झालेली रक्कम वसुल करण्यात यावी असा आदेश काढला होता..नंतर २७ नोव्हेंबर रोजी शासनानेच त्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने सदर स्थगितीचा आदेशच रद्द करण्यात यावा,व संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदतवाढ ३१ मार्च २१ पर्यत करण्यात यावी या मागणीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा व्हावा म्हणून धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील,धुळे शहरचे आमदार डाँ.फारुख शहा व साक्री आमदार मंजुळा गावित यांना निवेदन देण्यात आले. आमदारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहुन संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याची मार्च २०२१पर्यत मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली. यावेळी संघटनेचे राज्य प्रमुख संघटक भुपेश वाघ,जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे,विभागिय अध्यक्ष प्रभाकर चौधरी,विभागिय सचिव रविंद्र देवरे, महिला राज्य कोषाध्यक्षा रुखमा पाटील,महिला जिल्हाध्यक्ष दिपा मोरे, सरचिटणिस प्रतिभा वाघ,कार्याध्यक्ष प्रशांत महाले,जिल्हा प्रमुख संघटक रुषिकेश कापडे,महिला कार्याध्यक्ष सुरेखा बोरसे,कोषाध्यक्षा रंजना राठोड, मिरा परोडवाड,संगिता ठाकरे,दिलीप वाडेकर,कमलेश चव्हाण,खुशाल चित्ते आदी पदाधीकारी उपस्थित होते..