पीक प्रात्यक्षिके अर्जासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST2021-06-02T04:27:09+5:302021-06-02T04:27:09+5:30
धुळे : कृषी विभागाच्या विविध योजनेंतर्गत पीक प्रात्यक्षिकांसाठी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३ जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक ...

पीक प्रात्यक्षिके अर्जासाठी मुदतवाढ
धुळे : कृषी विभागाच्या विविध योजनेंतर्गत पीक प्रात्यक्षिकांसाठी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३ जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून सन २०२१-२२ या वर्षासाठी पीक प्रात्यक्षिक राबविण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी २४ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत ३ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. पीक प्रात्यक्षिकांसाठी समूह पद्धतीने अंमलबजावणी अपेक्षित असल्याने एका गावातून १० हेक्टर क्षेत्रासाठी प्रति प्रात्यक्षिक ०.४० हेक्टर क्षेत्राचे म्हणजेच २५ लाभार्थी प्रति समूह शेतकरी निवड करण्यात येईल. पीक प्रात्यक्षिक राबविण्याकरिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व गळित धान्य अंतर्गत पीकनिहाय अर्ज अपेक्षित आहेत. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्यातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे प्राधान्याने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.