चिपलीपाडाजवळ मेणबत्ती तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट, चार मजुरांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 17:02 IST2023-04-18T17:02:39+5:302023-04-18T17:02:49+5:30
घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

चिपलीपाडाजवळ मेणबत्ती तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट, चार मजुरांचा जागीच मृत्यू
राजेंद्र शर्मा
धुळे - साक्री तालुक्यात माळ माथ्यावर चिपलीपाडा गावाबाहेर असलेल्या मेणबत्ती तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात चार मजूर जागीच ठार झाल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या असून त्यांना उपचारार्थ नंदुरबार येथे पाठविण्यात आले आहे. मयत मजूर जैताने येथील राहणारे असल्याचे समजते. मयतांमध्ये आशाबाई भैया भागवत (वय ३५) आणि राजश्री भैया भागवत (वय १५), नयना संजय माळी, सिंधुबाई धुडकू राजपूत या चोघांचा समावेश आहे .