धुळे : धुळे ते पारोळा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पासुन ते पारोळा चौफुली (वळण रस्ता) डांबरीकरणाचे काम सुरू आहे़ या कामांची आमदार डॉ़ फारूख शाह यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात़सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाºया या कामांचे डांबरीकरण केले जात आहे़ रस्त्याचे साईड पट्यांचे काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना आमदार शाह यांनी सूचना केल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शहा, शाखा अभियंता झाल्टे यांच्यासह युसुफ पिंजारी, निलेश काटे, हाजी बोगीलाल आदी उपस्थित होते.
डांबरीकरणाच्या कामाची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 21:31 IST