धुळ्यात सुरू होणार नीट परीक्षा सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:17+5:302021-07-15T04:25:17+5:30

धुळे : अभियांत्रिकीसह विविध उच्च व्यावसायिक शिक्षणासाठी आवश्यक असलेले नीट एंट्रन्स एक्झाम सेंटर सुरू करावे, अशी मागणी होती. ...

The examination center will start in Dhule | धुळ्यात सुरू होणार नीट परीक्षा सेंटर

धुळ्यात सुरू होणार नीट परीक्षा सेंटर

धुळे : अभियांत्रिकीसह विविध उच्च व्यावसायिक शिक्षणासाठी आवश्यक असलेले नीट एंट्रन्स एक्झाम सेंटर सुरू करावे, अशी मागणी होती. अखेर या मागणीला केंद्र शासनाच्या एचआरडी मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्याने विद्यार्थांच्या शैक्षणिक अडचणी दूर होणार आहेत. या सेंटरसाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पाठपुरावा केला आहे.

धुळे, नंदुरबार जिल्ह्यात हजारो विद्यार्थांना नीट परीक्षा देण्यासाठी नाशिक येथे जावे लागते. त्यासाठी विद्यार्थी व पालकांना मोठी कसरत करावी लागते. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊन व प्रवास बंदीमुळे अनेक विद्यार्थी नीटची परीक्षा देऊ शकले नाहीत. अशावेळी असंख्य पालकांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे नीट परीक्षा केंद्र जिल्ह्यात सुरू करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार खासदार डॉ. भामरे यांनी दिल्लीतील मानव संसाधन, शिक्षण (एच.आर.डी.) मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्र्यांकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळवून आणली आहे. लवकरच याविषयी आदेश पारित होऊन धुळ्यात नीट परीक्षा सेंटर सुरू होणार आहे.

Web Title: The examination center will start in Dhule