महापालिकेच्या डेडरगाव तलाव प्रकल्पाचे शुभाेभिकरण करण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:35 IST2021-02-13T04:35:13+5:302021-02-13T04:35:13+5:30
हनुमानटेकडी जलशुध्दीकरण केंद्र तसेच डेडरगाव जलशुध्दीकरण केंद्राची शुक्रवारी सभापती सुनील बैसाणे यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक बंटी मासुळे, ...

महापालिकेच्या डेडरगाव तलाव प्रकल्पाचे शुभाेभिकरण करण्यासाठी प्रयत्न
हनुमानटेकडी जलशुध्दीकरण केंद्र तसेच डेडरगाव जलशुध्दीकरण केंद्राची शुक्रवारी सभापती सुनील बैसाणे यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक बंटी मासुळे, भगवान गवळी, नरेश चौधरी, किराण अहिरराव, रावसाहेब नांद्रे पाटील, राकेश कुलेवार, मनपा ओवरसियर चंद्रकांत उगले, ओव्हरसियर एन.के.बागुल आदी उपस्थित होते. हनुमान टेकडी येथील जॅकवेलचे बांधकाम जीर्ण झाल्याने येथील बांधकामाची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी महानगरातील नागरिकांच्या स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जलशुध्दीकरण केंद्रातील ॲलम ब्लिचिंग व क्लोरीन साठा योग्य पध्दतीने ठेवण्याच्या सूचना दिल्या.
हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्र तसेच डेडरगाव तलाव येथील जलशुध्दीकरण केंद्र येथे नगरसेवक व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून योग्य ती कामांबाबत कार्यवाही करणेबाबत सूचना देण्यात आल्या. डेडरगाव येथील जलशुध्दीकरण केंद्राची पाहणीप्रसंगी सदर डेडरगाव तलावाचे ब्रिटिशकालीन काम झालेले असून सदर तलावाची भिंत तसेच व्हॉल ८० वर्षांपूर्वीचा आहे. आतापर्यत मनपाकडून देखभाल दुरुस्तीसाठी एकही रुपया खर्च झालेला नाही.