शिक्षण घेणारा तरुण निघाला मोटारसायकल चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:39 IST2021-05-20T04:39:20+5:302021-05-20T04:39:20+5:30
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मंगळवारी खबर मिळाली होती, की काेणीतरी चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी ...

शिक्षण घेणारा तरुण निघाला मोटारसायकल चोर
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मंगळवारी खबर मिळाली होती, की काेणीतरी चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी सिद्धेश्वर गणपती मंदिराजवळ येणार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी पाळत ठेवली. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक तरुण लाल मोटारसायकलवर कोणाची तरी वाट पाहात असल्याचा आढळला. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिसांनी त्याला पकडले. त्याची विचारपूस केली असता नाव प्रतीक शिवाजी वारे (२०) रा. प्लाॅट नंबर ६, उत्कर्ष काॅलनी, पीरबाबा दर्गासमोर राहात असल्याची माहिती त्याने दिली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याचे त्याने सांगितले. विश्वासात घेऊन माहिती घेतली असता त्याने त्याच्या ताब्यातील एमएच २८ एआर २८७२ क्रमांकाची आणि एमएच १८ बीएफ २९७५ क्रमांक अशा दोन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. या दोन्ही मोटारसायकल चोरी झाल्याचा गुन्हा देवपूर पोलीस स्टेशनला दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली. दोन्ही गुन्ह्याची कबुली त्याने दिली आहे. अटक करून त्याच्याविरोधात भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोसई सुशांत वळवी, पोसई योगेश राऊत, हेकाॅ संदीप थोरात, पोलीस नाईक संतोष हिरे, संदीप सरग, प्रकाश सोनार, योगेश जगताप, किशोर पाटील, संजय सुरसे, कैलास महाजन हे सहभागी झाले होते.