कातरवेल गावाजवळ बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:23 IST2019-03-12T23:23:31+5:302019-03-12T23:23:53+5:30

विंचूर : नाशिक सरहद्दीवरील घटना

Dying leopards near Katwar village | कातरवेल गावाजवळ बिबट्या ठार

कातरवेल गावाजवळ बिबट्या ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
विंचूर : विंचूर-प्रकाशा महामार्गावर नाशिक-धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीवर कातरवेल गावाजवळ सोमवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला.
रात्री भक्ष्याच्या शोधासाठी बाहेर पडलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाची तोंडाला व पोटाला जोरदार धडक बसली़ त्यात बिबट्याचा जागीच मृत्यू पावला. अपघातात ठार झालेला बिबट्या नर जातीचा आहे. हा सुमारे तीन वर्षाचा असावा, असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे. यावेळी वनविभागाचे वनपाल पी. एस. खैरनार, वनरक्षक बी. यु. बहिरम यांनी घटनास्थळी पंचनामा केला़ जागेवरच ताहाराबाद पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोकणी व जायखेडा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खंदारे यांनी शवविच्छेदन केले़ त्यानंतर कातरवेळ येथील वनविभागाच्या हद्दीत  बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Dying leopards near Katwar village