भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 12:49 PM2018-07-03T12:49:46+5:302018-07-03T12:50:04+5:30

मआयडीसीसाठी भूसंपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला शासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने या शेतकऱ्यांनी टॉवर चढून आंदोलन करताच कुंभकर्णी प्रशासन खडबडून जागे झालं.

Due to lack of compensation for land acquisition, farmers aggressive | भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक 

भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक 

Next

धुळे - शिंदखेडा तालुक्यातील गोराणे, नरडा णा परिसरातील काही शेतकऱ्यांनी सकाळी साडे नऊ ते साडे दहाच्या दरम्यान गोराणे, नरडाणा परिसरात असलेल्या आणि होऊ घातलेल्या एमआयडीसीसाठी भूसंपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला शासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने या शेतकऱ्यांनी टॉवर चढून आंदोलन करताच कुंभकर्णी प्रशासन खडबडून जागे झालं.

प्रशासनाच्या आश्वासनानंतर दीड तास चालेलं आंदोलन अखेर आंदोलक शेतकऱ्यांनी मागे घेतलं. शरद भटू पाटील या शेतक-यासह गोराणे, नरडाणा परिसरातील काही शेतकरी मोबाईल टॉवर वर चढले. यानंतर घटनास्थळी  शिंदखेडा येथील तहसिलदार सुदाम महाजन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आंदोलक शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिलं. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतक-यांना एमआयडीसीसाठी भूसंपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला शासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टॉवर चढून आंदोलन करताच प्रशासन खडबडून जागे झालं.

Web Title: Due to lack of compensation for land acquisition, farmers aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.