धुळ्यातील डॉक्टराचा चांदवडनजीक अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:22 IST2018-07-17T22:19:25+5:302018-07-17T22:22:01+5:30
व्यक्त होतेय हळहळ : हजयात्रेकरूंना मुंबई येथे घेऊन जाताना घडली घटना

धुळ्यातील डॉक्टराचा चांदवडनजीक अपघातात मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : हज यात्रेसाठी जाणाºया काही हजयात्रेकरूंना मुंबई येथे सोडण्यासाठी जात असताना चांदवडनजीक झालेल्या कार अपघातात धुळ्यातील एका डॉक्टरचा मृत्यू झाला़ ही घटना मंगळवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली़
शहरातील फिरदोसनगरात राहणारे डॉ़ हर्शद गुलाब नुराणी (३६) हे एमएच १९ बीजे २१२२ या क्रमांकाच्या कारमध्ये काही मौलानांना हजयात्रेकरीता मुंबई येथे सोडण्यासाठी धुळ्याहून रवाना झाले़ नाशिकजवळ पिंपळगाव ते चांदवड दरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला़ ही घटना मंगळवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातात त्यांना जबर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू ओढवला़ शहरात ते राहत असलेल्या फिरदोस नगरात या अपघाताची वार्ता कळताच शोककळा पसरली़ काहींनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ दरम्यान, त्यांची पत्नी डॉक्टर असून त्यांना एक मुलगी आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई-वडील व पाच भाऊ असा परिवार आहे़