वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 22:45 IST2019-11-15T22:44:48+5:302019-11-15T22:45:22+5:30
शिरपूर : बोराडी परिसरात मॉर्निंग वॉक करणाºयांना बिबट्या दिसला

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे-दभाषी गावाजवळील तापी नदीवरील पूलानजिक रस्ता ओलांडणाºया एका बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक देवून जागीच ठार केल्याची घटना घडली़ घटनेचे वृत्त शिरपूर टोलनाक्यावरील अधिकाºयांना कळताच त्यांनी पोलिस व वनविभागाला कळविले़
१४ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ सावळदे गावाजवळील तापी नदीपूल ओलांडत असतांना हनुमान मंदिरसमोर पश्चिमेकडून पूर्व दिशेकडे जाणारा बिबट्या (मादी) ला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देवून पसार झाला़ घटनेचे वृत्त शिरपूर टोल नाक्यावरील अधिकारी व कर्मचाºयांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ तोपर्यंत बिबट्या ठार झालेला होता़
घटनेचे वृत्त पोलिस प्रशासन व वनविभागाला कळविल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झालेत़ मयत अवस्थेत वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेतले़
बोराडी परिसरात
बिबट्या दिसला
बोराडी येथील कर्मवीर नगरातील रहिवाशी हिंमत पवार व योगेश गोसावी हे दोघे १५ रोजी नेहमीप्रमाणे पहाटे ५ वाजता फिरण्यासाठी शिरपूर-बोराडी रस्त्यावरील नांदर्डे नर्सरीपर्यंत जातात. ते नेहमीप्रमाणे घाटी उतरून खाली गेल्यानंतर समोरून काहीतरी गेल्याचा भास झाला. पण लगेच रस्त्याच्या बाजुला त्यांना बिबट्या उभा असल्याचे दिसले. आकाराने मोठा असुन त्याच्या अंगावर पट्टे असल्याचे दिसून आले. त्या दोघांचा भितीने अंगाचा थरकाप झाला. पण नशीब बलवत्तर असल्याने शिरपूरकडून येणाºया एका वाहनाला हात दाखवून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला़ मात्र गाडी चालकाला कोण असेल म्हणून तो वाहनचालक थांबायला तयार नव्हता. अक्षरश: विनवणी करुन ते दोघे बोराडी पर्यंत आले. कदाचित त्यावेळी वाहन आले नसते तर दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता आली नसती़ त्यामुळे रात्री-पहाटे फिरणाºया लोकांनी यापुढे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे़
वने नष्ट होत असल्यामुळे प्राणी देखील अन्न व पाण्यासाठी रस्त्यावर येवू लागले आहेत़ अनेकदा महामार्गावर रस्ता ओलांडतांना प्राण्याचा मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ घडणाºया घटनांकडे गांभिर्याने पाहण्याची वेळ आहे़
वनविभागाचे तक्रारींकडे दुर्लक्ष
जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्या दिसला, पाळीव प्राण्यांवर हल्ला, त्यात पशुधनाचे नुकसान असे अनेक प्रकार प्रत्ययास येत आहेत. जंगलात भक्ष्य मिळत नसल्याने बिबट्याचा शेतशिवारांसह गावांच्या जवळील भागात वावर वाढला आहे. साक्री तालुक्यातील म्हसदी परिसरात अद्याप बिबट्याची दहशत कायम असून त्याचा विपरित परिणाम शेती हंगामावरही होत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी मात्र या प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही निदर्शनास आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. वनविभागाने हस्तक्षेप केल्यास काही प्रमाणात शेतकºयांसह मजूरवर्गालाही दिलासा मिळू शकणार आहे.