दोन दुचाकी अपघातात तरुणाचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:39 IST2019-04-18T21:39:03+5:302019-04-18T21:39:22+5:30

मोहाने रोडवरील घटना : पोलिसात घटनेची नोंद

The driver died in a two-wheeler accident | दोन दुचाकी अपघातात तरुणाचा अखेर मृत्यू

दोन दुचाकी अपघातात तरुणाचा अखेर मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील पुण्याचापाडा ते मोहाने रोडवर मंगळवारी दुपारी दोन दुचाकी अपघातात देशशिरवाडे येथील तरुणाचा मृत्यू झाला़ तर अन्य एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ घटनेची नोंद पिंपळनेर पोलिसात करण्यात आली़ 
साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथील महेंद्र सोमा पवार (२८) आणि कुहेर येथील पिंट्या सुरमल मालचे (२३) हे दोघे मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास एमएच १८ व्ही १८८० या क्रमांकाच्या दुचाकीने पुण्याच्यापाडा गावाहून मोहाने गावाकडे जात असताना समोरुन येणाºया एमएच १८ बीपी ३९४४ या क्रमांकाच्या मोटारसायकलमध्ये अपघात झाला़ या अपघातात महेंद्र पवार आणि पिंट्या मालचे जखमी झाले़ 
दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ उपचार सुरु असताना महेंद्र पवार याचा मृत्यू ओढवला़ याप्रकरणी मयत पवार याचा भाऊ आत्माराम पवार याने पिंपळनेर पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, गुन्ह दाखल झाला असून घटनेचा तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत़ 

Web Title: The driver died in a two-wheeler accident