दुहेरी खून प्रकरणातील गौरव पवार, भूषण कापकर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:36 IST2018-10-12T22:35:26+5:302018-10-12T22:36:33+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : एका ढाब्यावरुन घेतले ताब्यात

In the double murder case, Gaurav Pawar, Bhushan Chapkar Jeraband | दुहेरी खून प्रकरणातील गौरव पवार, भूषण कापकर जेरबंद

दुहेरी खून प्रकरणातील गौरव पवार, भूषण कापकर जेरबंद

ठळक मुद्देदुहेरी खून प्रकरणस्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपुरातील रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव या दुहेरी खून प्रकरणातील गौरव सुभाष पवार आणि भूषण कापकर या दोघा फरार संशयितांच्या एलसीबीच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी मुसक्या आवळल्या़  
चाळीसगाव ते मनमाड दरम्यान एका ढाब्यावर हे दोघे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली़ त्यानुसार सापळा लावण्यात आला़ त्यात गौरव आणि भुषण या दोघांना ताब्यात घेण्यात आले़ दुहेरी खून प्रकरणाची घटना ८ जून २०१८ रोजी देवपुर भागात सायंकाळी घडली होती़ यात संशयित बाजीराव उर्फ सुभाष सजन पवार, हर्षल उर्फ दादू रविंद्र पाटील, जयराज पाटील, भुपेश उर्फ भूपेंद्र वाल्मिक पाटील, ऋषिकेश पाटील, दर्शन परदेशी, वैभव उर्फ सोनू पवार हे न्यायालयीन कोठडीत आहेत़ 

Web Title: In the double murder case, Gaurav Pawar, Bhushan Chapkar Jeraband