जिल्हा अव्वल; शहरात योजनांना ‘घरघर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:56 IST2019-11-25T22:54:42+5:302019-11-25T22:56:23+5:30

घरकूल योजना : राज्यात दुसऱ्यास्थानी तर शिरपूर, साक्री तालुक्यांची बाजी

District Top; Plans in the city 'house to house' | जिल्हा अव्वल; शहरात योजनांना ‘घरघर’

जिल्हा अव्वल; शहरात योजनांना ‘घरघर’

धुळे : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई, शबरी, पारधी अशा विविध घरकुल योजनांतर्गत २ हजार ८५५ घरकुलांचे कामे पूर्ण करीत धुळे जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे़ उत्कृष्ट कार्याबद्दल शासनाकडून जिल्हास १० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे़
जागतिक आवास दिनानिमित्त मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आवास योजना ग्रामीण भागातील प्रभावी अंमलबजावणी करणाºया जिल्ह्याचा सन्मान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला़
जिल्ह्याला मिळालेले पुरस्कार
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्यस्तरीय रमाई, शबरी व पारधी योजनेंतर्गंत प्रथम टप्प्यात ८२.२ टक्के घरकुले पुर्ण केल्याने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला़ तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्यस्तरीय रमाई, शबरी व पारधी योजनेंतर्गंत प्रथम टप्प्यात ८२.९ टक्के घरकुले पूर्ण करुन नाशिक विभागात प्रथम तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गंत ४० हजार १६४ घरकुल पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते पडताळणी पूर्ण करुन राज्यात तृतीय क्रमांक मिळाला आहे़ असे १० पुरस्कारात जिल्ह्याला ४, साक्री तालुका ३ तर शिरपूर ३ पुरस्कारांचा समावेश आहे़
आदिवासी विभाग प्रथम
राज्यपुरस्कृत अदिवासी विकास विभागाच्या आवास योजनेंतर्गंत प्रथम टप्प्यात आजअखेर जिल्ह्यात २ हजार ८५५ घरकुले पूर्ण करुन राज्यामध्ये तृतीय क्रमांक मिळविण्यात यश मिळाले आहे़
शिरपूर व साक्री अव्वल
शिरपूर : आवास योजनेत घरकुले पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक,पंतप्रधान योजनेत घरकुले पूर्ण करून राज्यात द्वितीय क्रमांक अदिवासी विकास विभागाच्या आवास योजनेंतर्गंत घरकुले पूर्ण करुन द्वितीय क्रमांक, रमाई, शबरी व पारधी योजनेंतर्गत पारितोषिक मिळाले.
साक्री : केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेत घरकुले पूर्ण करून राज्यात द्वितीय क्रमांक, ग्रामीण अंतर्गत घरकुले पूर्ण करून राज्यात चौथा क्रमांक, अदिवासी विकास विभागाच्या आवास योजनेंतर्गत घरकुले पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव, धनंजय माळी उपस्थित होते. यावेळी बी. एम.मोहन, वाय. डी. शिंदे, एस. जी. शिवदे, जगन सुर्यवंशी, राघवेंद्र घोरपडे आदी पुरस्कार स्विकारला़

Web Title: District Top; Plans in the city 'house to house'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे