शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST

धुळे : जिल्ह्यात शनिवार, १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य ...

धुळे : जिल्ह्यात शनिवार, १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

डॉ. नवले यांनी म्हटले आहे की, कोविड १९ लसीकरण मोहीम जिल्हा रुग्णालय, धुळे, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, ग्रामीण रुग्णालय, साक्री व प्रभातनगर- धुळे शहर, असे ४ शीतसाखळी केंद्रांवर राबविण्यात येईल. या मोहिमेसाठी प्रथम दिवशी प्रति लसीकरण केंद्र १०० लाभार्थी याप्रमाणे एकूण ४०० आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात एकूण १० हजार १७० आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. त्यासाठी ‘कोविशील्ड’ या लसीचे १२ हजार ४३० डोस जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. यामध्ये धुळे महानगरपालिकेला ५ हजार २५० डोस, उपजिल्हा रुग्णालय शिरपूरला तीन हजार २६० डोस व ग्रामीण रुग्णालय साक्रीला तीन हजार ९२० डोस पुरविण्यात आले आहेत. जिल्ह्यात लसीकरण मोहीम चार केंद्रांवर होणार असून, यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुसज्ज करण्यात आली आहे. नियुक्त कर्मचारी आणि लस टोचकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व केंद्रांवर लसीकरणबाबत माहिती अद्ययावत करण्यासाठी इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व बाबींची तपासणी आज करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्‌घाटन होईल. त्यानंतर जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.विशाल पाटील आदी उपस्थित राहतील, असेही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी म्हटले आहे.