शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनासाठी जिल्हाधिका:यांना प्रस्ताव!

By admin | Updated: March 7, 2017 00:25 IST

महापालिका : स्वामिनारायणलगत पर्यायी रस्त्याचा प्रश्न, शासकीय तंत्रनिकेतनच्या विविध मागण्या

धुळे : शहरातील स्वामिनारायण मंदिर रस्त्याचा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आह़े या रस्त्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असून स्वामिनारायण मंदिरालगत पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी जमीन भूसंपादित करून ती मनपाकडे वर्ग करावी, असा प्रस्ताव महापालिकेने जिल्हाधिका:यांना पाठविला आह़े तर दुसरीकडे शासकीय तंत्रनिकेतनने काही मागण्या महापालिकेकडे पत्राद्वारे केल्या आहेत़स्वामिनारायण मंदिर रस्त्यावरील भिंत पाडण्यात आल्यापासून या रस्त्याचा वाद सुरू आह़े स्वामिनारायण  संस्थेने पर्यायी रस्त्यासाठी येणारा खर्च करण्याची तयारी दर्शविली आह़े त्यानुसार महापालिकेने पर्यायी रस्त्यासाठी जमीन भूसंपादित करून देण्याची मागणी जिल्हाधिका:यांकडे केली आह़े सदर जमीन भूसंपादनासाठी येणारा खर्च स्वामिनारायण संस्थेला करावा लागणार आह़ेसदर पर्यायी रस्त्याच्या भूसंपादनासाठी येणारी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निश्चित झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितल़े दरम्यान, महापालिकेने स्वामिनारायण मंदिरासमोर फलक लावला आह़े शहरासाठी मंजूर सुधारित विकास योजना 3 जुलै 2015 पासून लागू झाली आह़े त्याप्रमाणे देवपूर दत्त मंदिरापासून शासकीय तंत्रनिकेतनर्पयत आणि तेथून पुढे महामार्गार्पयतचा रस्ता बीएपीएस स्वामिनारायण मंदिराच्या मालकीच्या जागेच्या बाहेरून जाणारा आह़े  तो रस्ता तयार करण्याची कार्यवाही मनपातर्फे सुरू असल्याचे फलकावर नमूद करण्यात आले आह़े शासकीय तंत्रनिकेतनचे पत्रपर्यायी रस्ता शासकीय तंत्रनिकेतनच्या हद्दीतून जात असल्याने सदरच्या जागेचे भूसंपादन केले जाणार आह़े त्या दृष्टीने शासकीय तंत्रनिकेतनशी जिल्हा प्रशासनाचा पत्रव्यवहार सुरू आह़े मात्र शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ऱक़ेचौधरी यांनी मनपाला नुकतेच पत्र दिले असून त्यात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत़ स्वामिनारायण मंदिर रस्त्याच्या कामासाठी शासकीय तंत्रनिकेतनची जितकी संरक्षण भिंत जाणार आहे, त्या भिंतीचे बांधकाम करण्यात यावे, नवीन बांधण्यात येणा:या भिंतीद्वारे चोरांचा उपद्रव होऊ नये यासाठी त्यावर लोखंडी तारेचे कुंपण करण्यात यावे, सदर प्रस्तावित रस्त्यासाठी संस्थेची अंदाजित 7 हजार 400 चौरस मीटर जागा जाणार असल्याने बाजारभावाप्रमाणे जितकी किंमत होईल तेवढय़ा किमतीची इमारत शासकीय तंत्रनिकेतन संस्थेस बांधून देण्यात यावी (पूर्वी कळविण्यात आलेला भाव 5 हजार रुपये प्रती चौ.मी. होता, आता तो 21 हजार रुपये प्रती चौ.मी. आहे) असे पत्रात नमूद आह़े त्याचप्रमाणे स्वामिनारायण मंदिर परिसरातून शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात सोडण्यात येणारे सांडपाणी भूमिगत जलवाहिनी टाकून बाहेर सोडण्यात यावे, अटी व शर्तीची पूर्तता झाल्याशिवाय व रक्कम वर्ग झाल्याशिवाय संस्थेला पर्यायी रस्त्यासाठी जागा देणे शक्य होणार नाही, असे पत्रात नमूद आह़े  त्यामुळे प्रशासकीय पातळीवर सर्व आनुषंगिक बाबी तपासल्या जात आहेत़