शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST

धुळे : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत वाढला आहे. असे असले, तरी आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोना ...

धुळे : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत वाढला आहे. असे असले, तरी आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांनी कोरोना विषाणूविषयक नियमांचे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी केले आहे.

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी १६ हजार २७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, ३९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या दोन हजार ५९६ रुग्ण श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, एसीपीएम डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, महानगरपालिकेचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसह खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत. त्यात श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेन्टिलेटर्ससह ३५ खाटा, ऑक्सिजनयुक्त १००, तर सर्वसाधारण ३५० खाटा उपलब्ध आहेत. सध्या २०८ रुग्ण उपचार घेत असून ऑक्सिजनचा टँक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. याशिवाय एसीपीएम रुग्णालयात १००, जिल्हा रुग्णालयात ६०, महानगरपालिकेच्या जिल्हा रुग्णालयात ६०, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर येथे ८०, उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे ४० तसेच साक्री येथे ३० खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी बहुतांश खाटा या ऑक्सिजनच्या सुविधेसह आहेत. तसेच तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. तेथे १८०० खाटा उपलब्ध होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वॅब कलेक्शन सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या औषधोपचारासाठी आवश्यक सर्व साधनसामग्री, औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. एकीकडे कोरोना विषाणूच्या रुग्णांवर औषधोपचार सुरू असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. ९१ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला असून फ्रंटलाइनवरील ६३ टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. शासकीय, महानगरपालिकेसह खासगी रुग्णालये मिळून ५६ आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू असून रोज सरासरी साडेपाच हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे हे वास्तव आहे. बाधित रुग्ण व त्याच्या संपर्कातील किमान २० जणांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ मोहिमेत आढळून आलेल्या सहव्याधी रुग्णांच्या संपर्कात आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत.