सोनगीर येथे किराणा साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:37 IST2021-05-19T04:37:12+5:302021-05-19T04:37:12+5:30
ग्रामपंचायतीच्या वार्षिक वसुली ग्रामनिधीच्या पंधरा टक्के निधी हा मागासवर्गीय समाजाच्या परिसरात विकासासाठी खर्च करावा लागत असतो. यावर्षी कोरोनाच्या ...

सोनगीर येथे किराणा साहित्याचे वाटप
ग्रामपंचायतीच्या वार्षिक वसुली ग्रामनिधीच्या पंधरा टक्के निधी हा मागासवर्गीय समाजाच्या परिसरात विकासासाठी खर्च करावा लागत असतो. यावर्षी कोरोनाच्या या महामारीत मागासवर्गीय समाजातील अनेकांचा रोजगार गेल्याने बऱ्याच कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च करून मागासवर्गीय समाजातील गरजू व गरीब कुटुंबांना काही प्रमाणात आधार मिळावा म्हणून किराणा साहित्य देण्याचा निर्णय येथील मासिक बैठकीत समाजातील गरीब कुटुंबाना प्रत्येकी ५१० रुपयांचे किराणा साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रविवारी ग्रामपंचायत कार्यालयात माजी जिल्हा परिषद सदस्य शामलाल मोरे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष आर. के. माळी, ग्रामपंचायत सदस्य केदारेश्वर मोरे, राजेंद्र जाधव, राहुल देशमुख, लखन ठेलारी, पिंटू भिल, आरिफ पठाण, शपयोद्दीन पठाण, शाम माळी, समाधान पाटील, इरफान पठाण, मुन्ना पठाण, हाजी यांच्या उपस्थितीत किराणा साहित्य वाटप करण्यात आले.