शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डोस संपल्याने लसीकरणाला खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:38 IST

धुळे : कोरोना लसीकरणाचे डोस संपल्याने जिल्ह्यात लस कोंडी निर्माण झाली आहे. लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याने धुळे शहरातील २० ...

धुळे : कोरोना लसीकरणाचे डोस संपल्याने जिल्ह्यात लस कोंडी निर्माण झाली आहे. लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याने धुळे शहरातील २० लसीकरण केंद्रांसह ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवरील लसीकरण गुरुवारी ठप्प झाले होते. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र पुरेसे डोस प्राप्त न झाल्याने लसीकरण मोहीम थांबवण्याची वेळ जिल्हा आरोग्य विभागावर आली आहे.

जिल्ह्यात ४५ वर्षावरील नागरिकांची संख्या ७ लाख २२ हजार इतकी आहे. आरोग्य विभागाने शासनाकडे ८ लाख डोसची मागणी केली होती. मात्र केवळ ३३ हजार ५०० डोस प्राप्त झाले होते. मागणीच्या तुलनेत अल्प डोस मिळाल्याने आठवडाभरातच डोस संपले आहेत. दरम्यान, कोव्हॅक्सिन लसीचे ८ हजार डोस मंगळवारी प्राप्त झाले होते. ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. अशा नागरिकांना कोव्हॅक्सिनचा डोस दिला जातो आहे. मात्र कोव्हिशिल्डचे डोस उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहिमेत खोडा पडला आहे.

प्रतिक्रिया -

महानगरपालिकेच्या २० केंद्रांवर सध्या लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र कोव्हिशिल्ड लसीचे डोस संपल्याने सर्व केंद्रांवरील लसीकरण गुरुवारी बंद ठेवावे लागले. डोस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू होईल. लस टोचून घेण्यासाठी गुरुवारी लसीकरण केंद्रांवर आलेल्या नागरिकांना त्याबाबत सांगितले आहे.

- डॉ. पल्लवी रवंदळे, लसीकरण प्रमुख मनपा