जागेच्या वादात शौचालय रखडल्याने महिलांची कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 22:29 IST2020-01-16T22:28:37+5:302020-01-16T22:29:06+5:30

पांझरा नदीकाठचा परिसर : जागेचा शोध सुरु-आयुक्त, जागा दिल्यास शौचालय बांधून देणार-कार्यकारी अभियंता

The disgust of women by keeping the toilet in dispute over space | जागेच्या वादात शौचालय रखडल्याने महिलांची कुचंबणा

जागेच्या वादात शौचालय रखडल्याने महिलांची कुचंबणा

धुळे : देवपुरातील साईबाबा नगर, गवळीवाडा परिसरात सार्वजनिक शौचालय तोडल्यानंतर वर्ष उलटूनही बांधकाम करण्यात आलेले नाही़ परिणामी सर्वसामान्य महिलांची कुचंबणा होत असल्याचे अधोरेखित होत आहे़ जागेचा वाद यानिमित्ताने समोर आला असून जागा देण्यासाठी गवळी समाजाकडून पुढाकार घेतला जाणार असल्याचे समोर येत आहे़
देवपुरातील नकाणे रोडवर साईबाबा नगर, गवळीवाडा परिसर आहे़ ही वस्ती सर्वसामान्य नागरीकांची असल्यामुळे नगरसेवक भगवान गवळी यांनी २०११ मध्ये २० लाखांच्या निधीतून सार्वजनिक शौचालयाची उभारणी केली होती़ त्याचा लाभ या भागातील नागरीकांकडून घेतला जात होता़ अशातच वर्षभरापुर्वी पांझरा नदीपात्राच्या दोन्ही बाजुला प्रत्येकी साडेपाच किमी अंतराच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कामाला सुरुवात झाल्यानंतर रस्त्याच्या मधोमध येणारे सार्वजनिक शौचालय महापालिकेची परवानगी न घेता तोडण्यात आल्याचा आरोप नगरसेवक भगवान गवळी यांनी केला़ हे शौचालय तोडून वर्ष उलटूनही नव्याने शौचालय उभारण्यात आलेले नाही़ परिणामी महिलांचे हाल होत असल्यामुळे पांझरा नदी पात्रातच हिरवे कापड लावून तात्पुरत्या स्वरुपात शौचालयाची उभारणी करण्याची नामुष्की ओढवली आहे़
दरम्यान, पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे याच भागातील अनेकांच्या घरांचे नुकसान झाले़ पंचनामा केला़ आर्थिक मदत देऊ असे सांगण्यात आले़ पण, अजून मदत मिळाली नसल्साची कैफियत मांडण्यात आली़
नागरीकांसाठी फिरते शौचालय देणार
साईबाबा नगर परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले़ नंतर पाडण्यात आले आहे़ परिणामी नागरीकांची गैरसोय होत असल्यामुळे फिरते शौचालय देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे़ आयुक्त अजिज शेख यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत आहे़ लवकरच फिरते शौचालय या भागासाठी देण्यात येणार आहे़

सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम रस्त्यावर करण्यात आल्यामुळे ते काढण्यात आले़ जागा उपलब्ध करुन दिल्यास सार्वजनिक शौचालय बांधून देण्यात येईल़
- विनोद भदाणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग़
सार्वजनिक शौचालय पाडल्यानंतर पर्यायी जागेचा शोध सुरु आहे़ जागेसाठी नागरीकांचा विरोध असल्यामुळे काम थांबले आहे़ या भागातील अतिक्रमण काढून सार्वजनिक शौचालय बांधण्यात येईल़
- अजिज शेख, आयुक्त, महापालिका़
सामान्य नागरीकांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले़ नंतर ते पाडण्यात आले आहे़ प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असलातरी जागेचा मुद्दा पुढे आला आहे़ जागा देण्यासाठी गवळी समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन काही पर्यायी जागा देता येईल का यासाठी प्रयत्न केले जातील़
- लक्ष्मण दहिहंडे, प्रदेशाध्यक्ष, गवळी समाज, धुळे़

Web Title: The disgust of women by keeping the toilet in dispute over space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे