शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय रस्त्यावरील पसरलेल्या घाणीमुळे महिलांची कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:28 IST

वराहाची दुर्गंधी : काटेरी झुडपांनी वेढले; फरशी झाली निसरडी

मालपूर : हगणदारी मुक्त मालपूर गावात महिला शौचालयाच्या समस्यांनी त्रस्त असून वॉर्ड क्र. ३ मधील शौचालयाच्या रस्त्यावर प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथून चालणे देखील अशक्य असून रस्त्यावरच शौचालयाच्या पायऱ्यांवर वराह मृत्यूमुखी पडल्याने दुर्गंधी येत असल्यामुळे येथून जाणे देखील मुश्कील झाले आहे. यामुळे शनि मंदिर परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. याबाबत दखल घेणे गरजेचे आहे.मालपूर हे हगणदारीमुक्त गाव असून ‘स्वच्छ आणि हगणदारीमुक्त गावात आपले सहर्ष स्वागत आहे’ अशा आशयाचे फलक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक सभागृहाच्या बाहेरील भिंतीवर लावण्यात आले आहे. मात्र येथील महिला शौचालयाच्या समस्यांनी त्रस्त आहेत.मालपूर येथील वॉर्ड क्र. ३ मधील शनिमंदिर परिसरातील महिलांची प्रचंड कुचंबणा होत आहे. येथे अमरावती नदीच्या काठावर सार्वजनिक शौचालये असून त्यांची दुर्दशा झालेली आहे. काटेरी झुडपात वेढले गेले असून तेथे जाणेच सध्या अशक्य असल्याचे दिसून येत असून महिलांच्या तक्रारी आहेत.शौचालयात जाणे तर सोडा मात्र शौचालयाजवळ जाणे देखील रस्त्यावरील प्रचंड घाणीच्या साम्राज्यामुळे जिकिरीचे आहे. विठ्ठल मंदिर व सावता महाराज मंदिर दरम्यान समोरील रस्त्यावरुन या शौचालयाकडे जाण्याचा रस्ता असून सध्या या रस्त्यावरुन जाणे अशक्य आहे.या रस्त्यावर दगड फरशी असून गटारी तुडूंब भरल्यामुळे गटारीतील बेसुमार पाणी फरशीवरुन वाहत असते. आजुबाजूला काटेरी झुडपे यामुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य असून चालणे धोक्याचे झाले आहे. सतत पाणी वाहत असल्यामुळे दगडी फरशी निसरडी झाल्याने पडून गंभीर दुखापत होण्याचा धोका आहे तर आज २१ नोव्हेंबर रोजी या शौचालयाच्या पायऱ्यांवर वराह मरुन पडल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरुन येथे उभे राहणे देखील मुश्कील असल्याच्या महिलांच्या तक्रारी होत्या. यामुळे येथील महिलांची प्रचंड कुचंबणा होत असून याची त्वरित दखल घ्यावी, अशी तेथील महिलांची मागणी आहे.वॉर्ड क्र. २ मध्ये देखील इंदिरा नगर भागातील जलकुंभ परिसरातील महिला या अमरावती मध्यम प्रकल्पाकडे जाणाºया रस्त्यावर उघड्यावर बसत असल्याचे विदारक चित्र दिसून येत असून महिला शौचालयाच्या समस्यांन ग्रस्त असून याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी येथील महिलांची मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे