शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील स्टार्च फॅक्टरीवर जप्तीची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 22:19 IST

महसुल थकबाकीमुळे प्रशासनाने ठोकले कुलूप

धुळे :  येथील देवपूरातील ट्रेडको किसान प्रायव्हेट लिमीटेड कंपनीकडे थकलेल्या महसुलाची वसुली करण्यासाठी महसूल विभागाने जप्तीची कार्यवाही केली. तहसिलदार संजय शिंदे, धुळे शहराचे मंडळ अधिकारी आणि देवपूरचे तलाठी पाटील यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी स्टार्च फॅक्टरीला कुलूप ठोकले. स्टार्च फॅक्टरीकडे शासनाचा ३ लाख १७ हजार २२० रुपये इतका जमीन महसूल बाकी होता. देवपूरचे तलाठी ८ आॅक्टोबर २०२० रोजी वसुलीसाठी गेले होते. परंतु कंपनी बंद असल्याचे निदर्शनाला आल्याने कंपनीच्या प्रवेशद्वारावर नोटीस लावली. त्यानंतर धुळे शहराचे अपर तहसिलदार संजय शिंदे यांनी ११ नाव्हेंबर २०२० रोजी नमुना एकची नोटीस बजावून महसूल अदा करण्याविषयी संधी दिली होती. वसुलीसाठी सक्तीची कार्यवाही करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. तरी देखील संबंधितांनी महसूल भरला नाही. मसहूल देण्यात कसुर केला म्हणून सदर धारण जमीनीचे राज्य शासनाकडे समपहरण करण्यात आले.इतरांनाही दिला इशारामहसूल विभागाने इतरांनाही इशारा दिला आहे. ज्यांच्याकडे जमीन महसूल थकबाकी असेल अशा मिळकतधारकांनी संबंधित तलाठी यांच्याकडे चलनाने महसूलाचा भरणा करावा. अन्यथा मिळकत जप्तीची कार्यवाही केली जाईल, असा इशारा धुळे शहर अपर तहसिलदार संजय शिंदे यांनी दिला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे