शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मिनी लाॅकडाऊनला धुळेकरांचा खो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST

महानगरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शहरात आतापर्यंत २८ हजार ८०२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ...

महानगरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शहरात आतापर्यंत २८ हजार ८०२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर शहरात अनेकांचा मृत्यू झालेला आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरी संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ५ ते ३० एप्रिलपर्यंत मिनी लॅाकडाऊन जाहीर केला आहे. यात केवळ अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेली आहे. असे असताना बुधवारी तिसऱ्या दिवशी आग्रारोड, पारोळारोड, दत्तमंदिर, संतोषी माता चाैक, चाळीसगाव व मालेगावरोडसह साक्री रोड वरील दिवसभर बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजलेली होती.

व्यावसायिकसह नागरिक अनभिज्ञ

जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आग्राराेड व अन्य ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांना विचारले असताना त्यांना मिनी लाॅकडाऊनबाबत माहीत नव्हते. त्यामुळे देवपूर, साक्रीरोड तसेच पाचकंदिल बाजारपेठेत नागरिक बिनधास्त खरेदी करताना दिसून आले.

कारवाई पथक दिसेना

राज्य शासनाकडून कठोर निर्बंध लागू केलेले असताना बुधवारी शहरातील दुकाने दिवसभर सुरू होती. तर कारवाई करताना मनपाचे पथक कुठेही दिसून आलेले नाही. त्यामुळे सायंकाळी ७ वाजेपर्यंत बाजारात गर्दी दिसून आली. दरम्यान, नागरिकांना एकाच ठिकाणी गर्दी करण्यास मनाई असताना पोलिसांकडून शहरात कोणत्याही ठिकाणी कारवाई करताना दिसून आले नाही.

पेट्रोलपंप, बसस्थानक परिसर

बसस्थानक, पेट्रोलपंप, चहा व नाश्त्याचे गाडे तसेच रस्त्यावर खरेदीसाठी नागरिकांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. त्यामुळे मिनी लाॅकडाऊनचे पालन होताना दिसून आले नाही.