धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 18:05 IST2025-09-07T18:05:39+5:302025-09-07T18:05:57+5:30
शहरातील मोठ्या गणेश मंडळांचे विसर्जन तापी नदीपात्रात उशिरापर्यंत होत असते.

धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
धुळे शहरातील युवा उद्योजक, रील स्टार शुभम सिंघवी याचा गणेशविसर्जन करून परतत असताना अपघाती मृत्यू झाला आहे.
मुंबई–आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्याजवळ त्याच्या मोटरसायकलला भीषण अपघात झाला. यामध्ये शुभमच्या डोक्याला जबर मार बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ळे शहरातील सहजीवन नगर येथील शुभम हा रहिवासी आहे.
शहरातील मोठ्या गणेश मंडळांचे विसर्जन तापी नदीपात्रात उशिरापर्यंत होत असते. याचसाठी शुभम आज सकाळी दुचाकीने तापी नदीपात्राजवळ गेला होता. मात्र परत येत असताना झालेल्या अपघात झाला.