शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

शासनाच्या शैक्षणिक धोरणाविरोधात धुळ्यात शिक्षक संघटनांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:20 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

ठळक मुद्दे सन २००४-२००५ पासूनचे थकीत वेतनेतर अनुदान पूर्वीच्या नियमाप्रमाणे सर्व शाळांना द्यावे. सन २०१३-२०१४ पासूनचे वेतनेतर अनुदानही ५ टक्के ऐवजी १२ टक्क्यांनी द्यावे. शिक्षकेत्तर सेवकांचा नवीन आकृतीबंध लागू करावा. अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करावे. त्यांचे पगार आॅनलाइन करावेत. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील गेल्या अनेक वर्षांपासून बंद केलेली भरती पूर्वीप्रमाणेच शिक्षण संस्थांच्या मार्फत सुरू करावी. ४ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णय विरोधात अतिरीक्त शिक्षकांचे जि.प. शाळांमध्ये समायोजन करावे. कला, क्रीडा शिक्षकांच्या पूर्वीप्रमाणेच नियुक्त्या कराव्यात. प्राथमिक शाळेमध्ये लिपीक व सेवकांची पदे मान्य करावीत. शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांना शाळाबाह्य कामे देवू नयेत.

धुळे :  गेल्या १७ वर्षात शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्याऐवजी विद्यमान शासनकर्ते त्यात आणखी वाढ करीत असून शिक्षकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. शासनाच्या या शैक्षणिक धोरणाविरोधात विविध शैक्षणिक संघटनांतर्फे मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यानंतर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली . अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा, शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.), राय शिक्षण संस्था महामंडळ, मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक संघटना, आयटीआय निर्देशक संघटना, आश्रमशाळा संघटना, वसतीगृह संघटना व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या विद्यमाने हा मोर्चा काढण्यात आला.  शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. पुढे हा मोर्चा जुन्या आग्रारोडवरून कराचीवाला खुंटमार्गे महापालिका, झाशीचा राणीचा पुतळा, जुने प्रशासकीय संकुलाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी माजी आमदार जे. यू. ठाकरे, संजय पवार, संदीप बेडसे, रामकृष्ण पाटील, आर. व्ही. पाटील, डी. के. पवार, दिलीप सोनवणे, सुनील पवार, डॉ. अरूण साळुंखे, हेमंत ठाकरे, वाल्मीक दामोदर, विजय बोरसे, जे. आर. पवार, एस. आर. पाटील, आर. डी. शिसोदे, बी. डी. भदोरीया आदी उपस्थित होते. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राष्टÑीय व राज्य शासनाने शिक्षणावर सकल घरेलू उत्पादनाच्या कमीत कमी ८ टक्के खर्च केला पाहिजे. शिक्षणाचे व्यापारीकरण करणारे शासन विधेयक त्वरित रद्द करावे, वाडीवस्ती व दुर्गम भागातील दहा विद्यार्थी पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.