भाजपतर्फे धुळे, साक्रीत धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 01:22 PM2020-02-27T13:22:19+5:302020-02-27T13:22:46+5:30

तहसीलदारांना निवेदन : महाविकास आघाडी सरकारविरोधात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची निदर्शने

Dhule, Sakrit Dharna agitation by BJP | भाजपतर्फे धुळे, साक्रीत धरणे आंदोलन

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/साक्री : शेतकरी विरोधी धोरण, महिला अत्याचार आदी प्रश्नांविरोधात राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या निषेधार्थ धुळे व साक्री तालुका भाजपच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेचे पक्ष प्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री तसेच काँग्रेस, राष्टÑवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये एवढी मदत जाहीर केली होती. पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही मदत आणखी वाढवू, असेही जाहीर केले होते. या महाविकास आघाडी सरकारने अवकाळीग्रस्त शेतकºयांना प्रतिहेक्टरी ८ हजार रुपयांपेक्षा एक रुपयांचीही अधिक मदत दिलेली नाही. सरसकट कर्जमाफी करु, सातबारा कोरा करु, अशा घोषणा करणाºया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजना शेतकºयांची सरसकट फसवणूक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकºयांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ केली आहेत. केवळ पीक कर्जाचा या कर्जमाफीत समावेश केल्याने बहुसंख्य शेतकºयांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांबाबत कर्जमाफी योजनेत कुठलाच उल्लेख नाही. तसेच वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून अशांवर कडक कारवाई करावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
धुळे येथे धरणे आंदोलनात तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, सुभाष देवरे, किशोर सिंघवी, भाऊसाहेब देसले, डॉ.जिजाबराव पाटील, प्रा.डॉ.दत्ता परदेशी, विलास पाटील, किशोर शिंदे, संग्राम पाटील, आशुतोष पाटील, रामकृष्ण खलाणे, विनय परदेशी, मनोहर पाटील, गौरव सैंदाणे, कैलास जाधव, नवलसिंग पवार, पांडुरंग पवार, संजय मराठे, भारत पाटील, गणेश शिंदे, कैलास सोनवणे, भटू तेली, चंद्रशेखर शिंदे, राजेंद्र परदेशी, नितीन शिंदे, दिलीप सुर्यवंशी, आनंदराव पदमर, समाधान पाटील, ज्ञानेश्वर शार्दूल, फकिरा चौधरी, शांताराम पाटील, किशोर पाटील, अनिल भामरे, उमेश पाटील, लक्ष्मण देवरे यांच्यासह धुळे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
साक्री येथे धरणे आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, विलास बिरारीस, राजेंद्र खैरनार, महेंद्र देसले, जि.प. सदस्य विजय ठाकरे, जि.प. सदस्य गोकुळ परदेशी, माजी पं.स. सदस्य रमेश सरक, पंडीतराव पाटील, वेडू सोनवणे, अ‍ॅड.सुरेश शेवाळे, किरण सोनवणे, शैलेंद्र आजगे, उत्पल नांद्रे, हिंमत ठाकरे, चंद्रकांत पवार, साहेबराव बोरसे, दामोदर पगारे, विलास भावसार, मनिषा देसले, बापूसाहेब गीते, लोटन सोनवणे, दिपक भामरे, अनिल देसले, दीपक वाघ, विलास तोरवणे, सुधीर अकलाडे, भूषण ठाकरे, महेंद्र सावंत, प्रकाश नेरकर, महेंद्र देसले, गोकुळसिंह परदेशी, संजय सोनवणे, शाम देवरे, धनराज सोनवणे, गोकुळबाई भामरे, सुमनबाई जाधव, आशाबाई पाटील, कमलबाई गायकवाड, रोहिणी अकलाडे, सुनंदा तोरवणे, प्रशांत शिरसाठ, अ‍ॅड.पुनम काकुस्ते, खंडेराव कर्वे, संजय पाटील, डॉ.मुकुंद बोरसे, विश्वास पवार, चिंतामण बोरसे, संजय शिंदे, अमृत बोरसे, दीपक नांद्रे, योगेश भामरे, राजेंद्र खैरनार, रवींद्र कुंवर, शांताराम जाधव, गजमल कुवर, तुषार ढवळे, संजय नांद्रे, योगेश चौधरी, दिनेश भवरे, संजय मराठे, वसंतराव सोनवणे, रोहिदास महाले, गोरख भदाणे, युवराज महाले, महेंद्र वाणी, प्रकाश मासुळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Dhule, Sakrit Dharna agitation by BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे