Dhule: कार दुचाकी अपघातात उपचार घेणाऱ्याचा मृत्यू, दोघे जखमी
By देवेंद्र पाठक | Updated: November 7, 2023 18:48 IST2023-11-07T18:47:56+5:302023-11-07T18:48:24+5:30
Dhule Accident News: भरधाव वेगाने येणारी कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. त्यात एक ठार आणि दोन जखमी झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावानजीक सोमवारी दुपारी घडली.

Dhule: कार दुचाकी अपघातात उपचार घेणाऱ्याचा मृत्यू, दोघे जखमी
- देवेंद्र पाठक
धुळे - भरधाव वेगाने येणारी कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. त्यात एक ठार आणि दोन जखमी झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावानजीक सोमवारी दुपारी घडली. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील हाडाखेडजवळ प्रगती हॉटेलच्या समोर एमएच १४ जीएस ०७६८ क्रमांकाची कार आणि एमपी ४६ एमव्ही २९८२ क्रमांकाची दुचाकी यांच्यात अपघात झाला. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ग्यानसिंग किसन पावरा (वय ६०, रा. हाडाखेड ता. शिरपूर), सुकराम निमड्या पावरा (वय २६, रा. जोयदा ता. शिरपूर) आणि काशिराम महाज्या पावरा (रा. हाडाखेड ता. शिरपूर) या तिघांना गंभीर दुखापत झाली. तातडीने तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्यानसिंग पावरा यांच्या डोक्याला मार लागल्याने उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अन्य दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे. याप्रकरणी सुकाराम पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फरार कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलिस उपनिरीक्षक मंगला पवार घटनेचा तपास करीत आहेत.