धुळ्यात ३ हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 12:51 IST2025-12-22T12:51:11+5:302025-12-22T12:51:11+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गुन्हेगारी टोळ्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे

धुळ्यात ३ हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या
Dhule Municipal Corporation Elections: आगामी महापालिकासह जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी या वर्षात धडक प्रतिबंधात्मक मोहीम हजारांहून अधिक व्यक्तींवर विविध राबवण्यात आली आहे. या मोहिमेत ३ कलमान्वये कारवाई करण्यात आली असून, अनेक गुन्हेगारी टोळ्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. निर्भय वातावरणात निवडणूका पार पाडण्यासाठी पोलिसांची अवैध व्यावसायिक आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर करडी नजर आहे.
नगरपालिका निवडणुकांपूर्वीच पोलिसांनी सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या होत्या. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने या कारवायांची व्याप्ती वाढली आहे. यापूर्वी निवडणुकांमध्ये गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींसह दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईतांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत
गुन्हेगारांकडून समजपत्र व प्रतिज्ञापत्र लिहून घेतले
जिल्ह्यातील आणि धुळे महानगरपालिका क्षेत्रातील मटका, जुगार क्लब, गावठी दारूचीनिर्मिती, तस्करी, विक्री याशिवाय गांजा आणि इतर अमली पदार्थाच्या विक्रीवर नजर आहे. तसेच समजपत्र देणे, चांगल्या वर्तनाचे प्रतिज्ञाप्रत्र लिहून घेण्याच्या प्रक्रीया पोलीस स्टेशननिहाय केल्या जात आहे.
अवैध धंदे आणि जुगार अड्ड्यावर कारवाई
महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ नुसार, वारंवार गुन्हे करणाऱ्या १७२ व्यक्तींकडून 'चांगल्या वर्तणुकीचा बंधपत्र लिहून घेतले. जर त्यांनी पुन्हा गुन्हा केला, तर त्यांना मोठी दंडात्मक कारवाई किंवा कारावास होईल, असे सांगण्यात आले. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अंतर्गत संभाव्य गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान किंवा संशयास्पद ठिकाणी विनाकारण वावरणाऱ्या ५९ व्यक्तींवर ही कारवाई केली आहे. निवडणुकीच्या काळात रात्रीच्या वेळी पैसे वाटप, गुंडगिरी किंवा चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली.
गुन्हेगारी टोळ्याविरोधात तडीपारी, मकोकाचा बडगा
गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी तडीपारीच्या (हद्दपारी) कारवाईवर भर देण्यात आला आहे: कलम ५५ अॅक्टअन्वये जिल्ह्यातील ६ टोळ्यांमधील १७गुन्हेगारांना एकत्रितपणे तडीपार करण्यात आले आहे. कलम ५६ अॅक्ट अन्वये : वैयक्तिकरीत्या गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या शहरासह जिल्ह्यातील एकूण १६ सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले गेले. एमपीडीए कारवाई : सार्वजनिक सुव्यवस्थेला थोका निर्माण करणाऱ्या ७ कुख्यात गुन्हेगारांची स्वानगी कारागृहात (स्थानबद्धता) करण्यात आली आहे. मकोका : संघटित गुन्हेगारी करणाऱ्या 'सत्तार मेंटल' टोळीवर मोक्कांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. मोक्का अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही. या कायद्यात जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. "गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढणार नाही याची खबरदारी पोलिस घेत आहेत. ज्यांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर यापुढेही 'मकोका' आणि 'एमपीडीए' सारख्या कठोर कारवाया केल्या जातील- श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक, धुळे