शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

"तुमको मिर्ची लगी तो मै क्या करूं..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:31 IST

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray, Dhule Municipal Election 2026: धुळ्यातील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर टीकेची तोफ डागली

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray, Dhule Municipal Election 2026: राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जवळपास ६८ उमेदवार बिनविरोध आल्याच्या मुद्द्यावरून राजकीय रणकंदन सुरू आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, अशा ठिकाणच्या निवडणुका रद्द करून त्या प्रभागांमध्ये नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच निवडणूक आयोग भाजपाच्या सांगण्यानुसार काम करत असल्याचे आरोपही उद्धवसेनेकडून सातत्याने करण्यात येत आहेत. याच मुद्द्यावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

"या वेळेला आपण सर्वांनी कमाल केलीत. सर्वत्र निवडणुकांचा माहोल आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पण धुळ्यात सुरुवातीलाच चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तुम्ही बिनविरोधचा चौकार लगावला आहे. धुळ्यामध्ये भाजपने चार नगरसेवक निवडून आणले आहेत. पण आपले नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यामुळे काही लोकांना मात्र मिर्ची झोंबली आहे. अब तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू..." अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला.

लोकसभेत काँग्रेसच्या काळात ३३ खासदार बिनविरोध

"देशाच्या लोकसभेमध्ये तब्बल ३५ खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी ३३ खासदार हे काँग्रेसच्या काळात निवडून आले आहेत. खासदार जेव्हा बिनविरोध निवडून येतात तेव्हा लोकशाही जिवंत असते आणि धुळेकरांनी आमचे चार नगरसेवक बिनविरोध दिले, तर लोकशाहीचा खून झाला. असे म्हणणाऱ्यांचे डोकं नेमकं कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. आमची जनता आमच्यावर प्रेम करते. आम्ही जनतेचे  स्वीकारतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. प्रत्येक शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न असेल," असे आश्वासन फडणवीसांनी दिले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

सध्याची सत्ता लोकशाही नसून झुंडशाही आहे. दमदाटी करून बिनविरोध निवडणुका लादल्या जात असून, निकाल राखून ठेवले जात आहेत. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले गेले. विशेषतः जेन-झी मतदारांचा हक्क हिरावला गेला आहे. जेथे बिनविरोध निवडणुका झाल्या, तेथे प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis mocks Thackeray: "What can I do if it stings?"

Web Summary : Fadnavis taunted Thackeray over Uddhav Sena's allegations of BJP influencing elections after unopposed wins in Dhule. He highlighted Congress's past unopposed wins, defending current victories and criticizing calls for re-elections.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Dhule Municipal Corporation Electionधुळे महानगरपालिका निवडणूक २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे