शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दारुचा कारखाना उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 21:52 IST

राज्य उत्पादन शुल्क : शिरपूर तालुक्यातील कारवाईत लाखाचा मुद्देमाल जप्त

शिरपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी शिरपूर तालुक्यात केलेल्या एका कारवाईत बनावट दारुचा मिनी कारखाना उध्वस्त करीत हजारो रुपये किंमतीच्या मद्यसाठ्यासह मद्यनिर्मितीचे साहित्य जप्त केले आहे़ याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे़राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने शिरपूर तालुक्यातील गरताड गावात योगेश भावराव धनगर याच्या राहत्या घरात सुरू असलेल्या बनावट दारूच्या मिनी कारखान्यावर अचानक छापा मारला़ पथकाने केलेल्या पाहणीत घटनास्थळी बनावट दारु तयार केली जात असल्याचे निष्पन्न झाले़राहत्या घरात अंदाजे ६० हजार रुपये किंमतीचे सिलिंग मशीन, ४०० रुपये किंमतीचे शितपेयाचे आठ रिकामे कॅरेट आणि ४२ हजार ९०० रुपये किंमतीची बनावट देशी ब्लेंड दारुचा साठा आढळून आला़ ३५ लिटर क्षमतचे सहा ड्रम मद्यसाठ्याने भरलेले होते़ हा संपूर्ण साठा जप्त करुन योगेश भावराव धनगर याला ताब्यात घेतले आहे़ एकूण एक लाख तीन हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक बी़ आऱ नवले, निरीक्षक बी़ एस़ महाडीक, थाळनेर पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक ए़ ए़ रसाळ, सिमा तपासणी नाका हाडाखेडचे दुय्यक निरीक्षक के़ एऩ गायकवाड, एऩ एस़ गायकवाड, शिरपूरचे दुय्यम निरीक्षक एम़ पी़ पवार, धुळे ग्रामीणचे दुय्यम निरीक्षक टी़ एस़ देशमुख, सहायक दुय्यम निरीक्षक एस़ पी़ कुटे, जवान अमोद भडागे, शांतीलाल देवरे, जे़ बी़ फुलपगारे, के़ एम़ गोसावी, अमोल धनगर, डी़ टी़ पावरा, गोरख पाटील, केतन जाधव, एस़ एस़ खाटीक, एम़ पी़ माळी, वाहन चालक विजय नाहीदे यांच्या पथकाने ही कारवाई केली़याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भरारी पथकाचे निरीक्षक बी़ आऱ नवले करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे