शिरपूर तालुक्यातील घटनेनंतर तृतीयपंथीयांची धुळ्यात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST2021-08-22T04:38:43+5:302021-08-22T04:38:43+5:30
धुळे : शिरपूर तालुक्यातील हाडाखेड सीमा तपासणी नाका परिसरात एका तृतीयपंथीयाला झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ तृतीयपंथीयांनी शुक्रवारी धुळे येथे ...

शिरपूर तालुक्यातील घटनेनंतर तृतीयपंथीयांची धुळ्यात निदर्शने
धुळे : शिरपूर तालुक्यातील हाडाखेड सीमा तपासणी नाका परिसरात एका तृतीयपंथीयाला झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ तृतीयपंथीयांनी शुक्रवारी धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर येथील रहिवासी आरती जाेगी ही भिक्षा मागण्यासाठी हाडाखेड येथे गेली हाेती. तेथे सेंधवा येथील अन्नू नायक, गुड्डी, काली, गाैरी, पूजा व त्यांच्याबराेबर असलेल्या पाच ते सहा जणांनी तिला चारचाकी वाहनात बसवून हाॅटेलमध्ये नेले. तेथे तिला मारहाण करण्यात आली. चटके देत बंदुकीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या दाेन साेन्याच्या अंगठ्या, गळ्यातील तीन ताेळे वजनाची साेन्याची चेन, अडीच ताेळ्याची साेन्याची पाेत, पायातील अर्धा किलाे चांदीच्या पाट्या दागिन्यांसह ९० हजार रुपये लुटून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरी पाेलिसांनी संशयितांना अटक केली नाही. त्यामुळे हाडाखेड नाका परिसरातील भिक्षा मागणाऱ्या तृतीयपंथीयांच्या जीवितास धाेका निर्माण झाला आहे. दाेषींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निदर्शने करताना आरती जाेगी, नीलू पार्वती जाेगी, स्वरा पार्वती जाेगी, रूपाली पार्वती जाेगी, विजा पार्वती जाेगी, साक्षी पार्वती जाेगी, जान्हवी संदल जाेगी, रेणुका नीलू जाेगी, विशाखा चंदन जाेगी, अंकिता चंदन जाेगी, वैशाली विजा जाेगी, हीना सबलन जाेगी, सचिन शेवतकर, शांताराम अहिरे, मीना भाेसले आदी सहभागी झाले होते.