शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक जातीनिहाय जनगणनेस टाळटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:27 IST

बाळासाहेब कर्डक : समता परिषदेतर्फे ‘जनगणना पे चर्चा’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कजैताणे : सन १९३१ नंतर दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत देशातील बहुसंख्य असणाºया ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना जाणीवपूर्वक टाळण्याचा यशस्वी प्रयत्न राज्यकर्त्यांकडून झाला आहे. देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीसह सर्वच मालमत्तेत वाटेकरी असणाऱ्यांना संख्येच्या तुलनेत अधिकारापासून वंचित ठेवणे ही देशाशी, जनतेशी प्रतारणा आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी केले.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे धुळे येथील ज्येष्ठ नागरिक संघात ‘जनगणना पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बाळासाहेब कर्डक बोलत होते. यावेळी त्यांनी सातत्याने ही मागणी दुर्लक्षित करण्यात येत असल्याचेही सांगितले.जोपर्यंत जातनिहाय ओबीसी जनगणनेच्या रकाना जनगणनेच्या फॉर्म मध्ये समाविष्ट केला जात नाही. तोपर्यंत या जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी राष्टीय पातळीवर घेतली असल्याचे धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांनी सांगितले. यावेळी बापू महाजन, कवीता क्षीरसागर, बी.बी. महाजन, एस.टी. चौधरी, मिलिंद सोनवणे, आण्णा माळी यांनीही विचार मांडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कर्डक होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश बागूल, विभागीय संपर्क प्रमुख अनिल नळे, संतोष पुंड, जिल्हा कार्याध्यक्ष आर.के. माळी, उपाध्यक्ष गोकुळ पाटील, सचिव बापू महाजन, विलास माळी, महानगर प्रमुख गोपाळ देवरे, दिलीप देवरे, मिलिंद सोनवणे, मातंग समाज अध्यक्ष वाल्मिक जाधव, एस.टी. चौधरी, बी.बी. महाजन, लोहार समाज अध्यक्ष भानुदास लोहार, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश बागुल, सतीश बाविस्कर, प्रकाश गवळे, दौलत जाधव, पंकज सोनवणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रविंद्र सुर्यवंशी यांनी केले. आभार प्रदर्शन आर.के. माळी यांनी केले. बैठकीला धुळे जिल्ह्यातून समता सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे