धुळे : भरधाव वेगाने धुळे तालुक्यातील बोधगावच्या दिशेने जात असलेली दुचाकी गरताड शिवारात घसरली़ यात जखमी झालेल्या एकाचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला़ मोहाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला़२८ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुभाष साहेबराव पाटील हे महेंद्र पाटील (रा़ देवपूर) यांच्या एमएच १८ एटी ९१७९ क्रमांकाच्या दुचाकीवरुन धुळ्याहून कापूस बियाणे घेऊन बोधगावकडे जात होते़ त्यावेळी रस्त्यावरील खड्डे, रस्त्याची स्थिती याकडे लक्ष न देता गाडी जोरात चालविण्यात आली़ परिणामी गरताड गावाजवळ त्यांची दुचाकी घसरली़ यात सुभाष पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ याप्रकरणी सुनिता सुभाष पाटील यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने चालक महेंद्र पाटील (पूर्ण नाव माहित नाही) या दुचाकी चालकाविरुध्द गुन्हा नोंद झाला़
दुचाकी घसरल्याने गंभीर जखमीचा मृत्यू, गुन्हा नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 21:53 IST