अवकाळीमुळे पपई पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:26 IST2021-06-02T04:26:51+5:302021-06-02T04:26:51+5:30
गोंदूर येथे जानेवारीत महिन्यात पपई लागवड केली आहे. पाच महिन्यांच्या पपई पिकाची चांगल्या प्रकारे वाढ झालेली होती. आतापर्यंत बराच ...

अवकाळीमुळे पपई पिकाचे नुकसान
गोंदूर येथे जानेवारीत महिन्यात पपई लागवड केली आहे. पाच महिन्यांच्या पपई पिकाची चांगल्या प्रकारे वाढ झालेली होती. आतापर्यंत बराच खर्च लागवडीवर झालेला आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे लागवड केलेल्या गोंदूर येथील असंख्य शेतकऱ्यांची पपईची झाडे तुटून पडली आहेत.
गावातील प्रगतशील शेतकरी भारत काशिनाथ पाटील, काशिनाथ सखाराम पाटील, चंद्रकांत काशिनाथ पाटील, सुभाष नामदेव पाटील, रोहिदास नामदेव पाटील, शिवाजी नामदेव पाटील व इतर शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची अपेक्षा केली आहे. गोंदूरच्या तलाठी सूर्यवंशी, वाघ व कृषी सहायक यांना फोन करून नुकसानीची माहिती देण्यात अली. त्यांनीही तत्काळ पंचनामा करून शासनास माहिती देण्यात येईल, असे सांगितले. नुकसान झालेल्या शेती पिकाचे पाहणी करण्यासाठी माजी सरपंच सखाराम पाटील, चेतन पाटील, पोलीस पाटील संजय पाटील आदी उपस्थित होते.