वडेल चौफुलीवर दोघांना चाकूचा धाक दाखवून लुटले

By देवेंद्र पाठक | Updated: June 10, 2024 17:16 IST2024-06-10T17:16:38+5:302024-06-10T17:16:55+5:30

वडेल चौफुलीवर दुचाकी आली असता तीन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून अडविले. तरुणाकडील १२ हजार ३०० रुपये रोख रक्कम हिसकावली.

Dadel robbed both of them at the knife point | वडेल चौफुलीवर दोघांना चाकूचा धाक दाखवून लुटले

वडेल चौफुलीवर दोघांना चाकूचा धाक दाखवून लुटले

धुळे - वडेल गावाकडून धुळे शहराकडे दुचाकीने येणाऱ्या दोघांना चाकूचा धाक दाखवून १२ हजार ३०० रुपयांत लुटल्याची घटना एप्रिल महिन्यात घडली होती. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात रविवारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला पकडले असून त्याची चौकशी सुरू आहे. ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शत्रुघ्न शिंदे (वय २७, रा. चंदननगर, देवपूर) हा तरुण एका मुलीसोबत वडेलकडून धुळ्याकडे येत होता.

वडेल चौफुलीवर त्यांची दुचाकी आली असता तीन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून अडविले. तरुणाकडील १२ हजार ३०० रुपये रोख रक्कम हिसकावली. दोघांना मारहाण केली. शिवीगाळ करत तिघांनी पोबारा केला. ही घटना ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी दुपारी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तिघांपैकी एका संशयिताला पकडले. पोलिस उपनिरीक्षक मनोज कुुवर घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Dadel robbed both of them at the knife point