शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

जिज्ञासा ही संशोधनाची जननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 12:19 PM

आर.एस. पाटील : साक्री येथे प्रतिपादन 

साक्री : जिज्ञासा ही नवनिर्मितीची व संशोधनाची जननी आहे. याच  जिज्ञासेच्या जोरावर मानवाने विज्ञानाच्या माध्यमातून विविध शोध लावले़ ज्यातून सुखी जीवन निर्माण करुन मनुष्यप्राणी सर्वश्रेष्ठ जगज्जेता झाला़ असे विचार जळगाव विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ़ आऱ एस़ पाटील यांनी केले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सीलेज बेसड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि विज्ञान प्रसार नवी दिल्ली यांच्या सहकार्याने साक्री येथील सी़ गो़ पाटील महाविद्यालयात आयोजित १०७ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आयोजित बाल विज्ञान मेळाव्याच्या समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ़ पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ़ ए़ पी़ खैरनार होते.आपल्या समारोपाच्या भाषणात डॉ़ पाटील पुढे म्हणाले, वैज्ञानिक संशोधन हे सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया असून अशा उपक्रमांच्या माध्यमातून या संशोधनात अधिकची भर पडेल म्हणून त्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले. डॉ़ खैरनार यांनीही मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले़  डॉ़ राजेंद्र अहिरे यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ़ प्रीतम तोरवणेंनी अहवाल सादर केला. सुत्रसंचालन प्रा़ डॉ़  प्रकाश साळुंखे व आभार डॉ़ सचिन नांद्रे यांनी मानले़ मधमाशी पालनाचे फायदे याविषयी प्रा.डॉ.लहू पवार यांनी प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले.पी़ झेड़ कुवर, आऱ एम़ शेवाळे, डॉ़ एस़ एस़ पाटोळे, डॉ़ एस़ जी़ देसले, विजय हिरे, एस़ व्ही़ सोनवणे, डॉ़ डी़ एस़ चव्हाण, अभय यावलकर, डॉ़ एस़ सी़ बोरसे, डॉ़ सचिन नांद्रे, प्रा. एम. एच. शेख, डॉ. सुदाम चव्हाण, प्रा. सदाशिव वाघ, प्रा. सुनील पालखे, डॉ. नगराळे, प्रा. खैरनार आदींनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :DhuleधुळेSakriसाक्री