शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक न्यायालयात सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:46 IST

बालदिनाचे औचित्य : वाद असलेल्या कुटुंबातील मुलांबरोबर उपक्रम

धुळे : येथील कौटुंबिक न्यायालयात बाल दिनानिमित्त कौटुंबिक वादविवाद असलेल्या कुटुंबातील मुलांबरोबर १६ रोजी सायंकाळी बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी मुलांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यायाधीश न्या.डी.एम. उपाध्ये तर प्रमुख पाहुणे म्हणून वैशाली उपाध्ये उपस्थित होते.कौटुंबिक वादविवाद असलेल्या कुटुंबातील मुलांबरोबर बालदिन साजरा करत वादविवाद असलेल्या कुटुंबातील मुला-मुलींमधील कलागुणांना वाव मिळावा व त्यांना प्रेरणा मिळावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वादविवाद असलेल्या कुटूंबात लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होऊ नये, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे, कुटुंबातील कलहामुळे मुलांकडे आई-वडीलांचे दुर्लक्ष होऊ नये. यासाठी अशा मुलांना सोबत घेऊन बालदिन साजरा करण्यात आला.कौटुंबिक न्यायालयातील कर्मचाऱ्यांचे पाल्य देखील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मुलांनी नृत्य, गायन, मिमिक्री, कविता, विनोद आदी कार्यक्रमांचे सादरीकरण केले.कुटुंब न्यायालय कायदा १९४८ हा विशेषत: वैवाहिक व कौटुंबिक कलह सोडविण्यासाठी कुटुंब न्यायालयाची निर्मिती झाली आहे. कौटुंबिक न्यायालयात तडजोड घडविण्यासाठी समुपदेशकाचा महत्वाचा सहभाग असतो. या अनुषंगानेच धुळ्यात २८ जुलै २०१८ रोजी कौटुंबिक न्यायालयाचे उदघाटन झाले आहे.कार्यक्रमास कौटुंबिक न्यायालयाचे विवाह समुपदेशक अनुराधा खरात, प्रबंधक ए.व्ही. मिर्झा, सहा. अधीक्षक एम.बी. जोशी, लघुलेखक एच.ए. रामोळे, समुपदेशक इंदिरा बैसाणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भावना बागल, महेंद्र सूर्यवंशी, दिनेश मोहिते, राकेश मोरे, एस.बी. अहिरराव, एजाज शेख, एस.एस. उंदरे यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Dhuleधुळे