शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेत केळी, द्राक्षासह आंबा मोसंबीचा केला समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 12:25 IST

धुळे जिल्हा : कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक, लाभ घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा २०२०-२१ लागू करण्यात आली आहे. आंबिया बहारमध्ये धुळे जिल्हयासाठी केळी, आंबा, डाळींब, द्राक्ष या पिकांचा समावेश करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली आहे.कृषी अधीक्षक सोनवणे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, फळ पिकाचे प्रतिकूल हवामान घटकापासून नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकºयांचे होणारे नुकसान भरून निघावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारिक पीक विभागा योजना लागू करण्यात आलेली आहे.धुळे जिल्ह्यासाठी द्राक्ष,केळी,मोसंबी आंबा,डाळींबा या पाच पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई, यांची निवड करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांंना बॅँकेत फळ पिक विमा भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यात द्राक्ष पिकासाठी १५ आॅक्टोबर, केळी व मोसंबीसाठी ३१ आॅक्टोबर, तर आंबा व डाळींब या फळ पिकासाठी ३१ डिसेंबर २०२० अंतिम मुदत राहील. ही योजना जे शेतकरी विविध वित्तीय संस्थाकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्यांची अधिसूचित फळ पिकासाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर आहे. तसेच कर्जदार, बिगर कर्जदार शेतकºयांना ही योजना ऐच्छिक आहे. शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.मोसंबीचा प्रथमच समावेशदोन वर्षांपूर्वी हवामान आधारित पीक विमा योजनेत लिंबू व पेरू या दोन फळांसह एकूण सहा फळांचा समावेश करण्यात आलेला होता. मात्र २०१९-२० मध्ये या लिंबू व पेरू या फळांना वगळले आले आहे. आता फक्त केळी, डाळींब, द्राक्ष व आंबा या पिकांसह मोसंबीचा प्रथमच योजनेत समावेश करण्यात आलेला आहे.