शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सामोडे येथे बनावट दारुचा कारखाना उद्धवस्त, १ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 15:13 IST

धुळे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी साक्री तालुक्यातील सामोडे येथे छापा टाकून तेथे एका खोलीत सुरु ...

धुळे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी साक्री तालुक्यातील सामोडे येथे छापा टाकून तेथे एका खोलीत सुरु असलेला बनावट दारु तयार करण्याचा कारखाना उद्धवस्त केला. तेथून १ लाख १० हजार ७९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच गुलाब बाबुलाल शिंदे याला अटक केली.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धुळे जिल्ह्याच्या भरारी पथकाने मंगळवारी साक्री तालुक्यातील सामोडे येथे जय भद्रा मारोती मंदिरासमोर, व्यायामशाळे लगत असलेल्या खोलीवर छापा टाकला. त्यावेळी खोलीत बनावट दारु तयार करण्याचा मिनी कारखाना सुरु असल्याचे उघडकीस आले. खोलीत बनावट देशी दारु व तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १ लाख १० हजाराचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. त्यात ४२ हजाराची बनावट देशी दारु टॅंगो पंचच्या भरलेल्या ८१६ बाटल्याचे १७ बॉक्स, ४० हजाराची इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलीच्या २८८ बाटल्या, १० हजाराचे बाटल्या पॅकींगचे मशिन, ६०० रुपयाचे बाटलीचे बूच, स्पिरीट आणि अन्य साहित्याचा समावेश होता. याठिकाणाहून गुलाब बाबुलाल शिंदे (३१) रा.स्वराज भवन, पिंपळनेर याला अटक करण्यात आली.

कारवाई जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी निरीक्षक बी.आर.नवले यांच्या पथकाने केली. त्यांना नाशिकचे फुलझळके,एस.आर.नजन, दुय्यम निरीक्षक, के.एन.गायकवाड, दुय्यम निरीक्षक, साक्रीचे प्रशांत दळवी,सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.एस.गोवेकर यांच्यासह अन्य कर्मचारी होते.