शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रूग्ण वाढीचा आलेख घसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 20:19 IST

दिलासादायक : दोंडाईचा शहरात आतापर्यंत ८३३ बाधित आढळले, ७५६ जणांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखत असतांनाच चाचण्याची संख्या वाढविण्यात आली आहे.त्यामुळे दोडाईचात कोरोना कोरोना संसर्ग बाधिताचा आलेख घसरत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे.सोमवारी तर एकही कोरोना बाधित आढळून आला नाही.आतापावेतो ८३३ बाधित आढळून आले आहे. त्या पैकी २६ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे ७५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या विविध ठिकाणी ५१ जण कोरोनवर उपचार घेत आहेत.कोरोना बाधित मृत्यू दर ३.१ टक्के झाला आहे,त्या मुळे चिंतेत भर पडली आहे.आमदार जयकुमार रावल व नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांचा मार्गदर्शनखाली नगरपालिकेने नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. चाचण्या व ट्रेसिगचे प्रमाण वाढले आहे. आठ दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’चाही सकारात्मक परिणाम झाला आहे. माझे कुंटुंब माझी जबाबदारी सर्व्हे सुरू आहे.नागरिकांतही जबाबदारीचे भान वाढले आहे.या सर्वांचा परिणाम म्हणून कोरोना बाधित संख्या घटल्याचे दिसत आहे.२४ ते २८ सप्टेंबर या पाच दिवसांचा आढावा घेतला तर दिलासादायक चित्र दिसत आहे.या पाच दिवसात वैद्यकीय अधिकारी व स्वॅब घेणाºया पथकाने २३० जणांचे स्वॅब घेतलेत.त्यात २४ रोजी ५१ ,२५ रोजी ४२,२६ रोजी ३६,२७ रोजी ६१ व २८ ला ४० जणांचे स्वॅब घेतले. त्यात अनुक्रमे ७, १५,१०,१४ व २८ रोजी शुन्य असे ४६ रुग्ण कोरोना बाधित आढळलेत.दोंडाईचा शहरात कोरोना रुग्ण घटल्याचे दिसत आहे. मात्र ग्रामीण भागात दुप्पट कोरोना बाधित आढळून आल्याने तेथे उपाययोजना सक्तीने राबविणे गरजेचे दिसत आहे.४६ पैकी १५ दोडाईचात तर निमगुळ, मांडळ,भडणे, रामी, लंघाणे, टाकरखेडा,होळ,तावखेडा,निरगुडी,वरपाडे, शेवाडे,वेदाने,न्याहली या ग्रामीण भागात ३१ कोरोना बाधित आढळून आले आहेत. दोडाईचात सोमवारी एकही कोरोना बाधित आढळून न आल्याने समाधान व्यक्त होत आहे.परंतु नागरिकांनी गाफील राहून चालणार नसून कोरोना वाढुच नये म्हणून नेहमी सतर्क राहून मास्क वापरणे,सोशल डिस्टन्स ठेवणे आदी उपाययोजना कराव्यात.